कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांसमोर ठिय्या, पोलिसांनी खेचून बाहेर काढलं; मध्यरात्रीही राडा

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar Mid Night Protest : काल विधीमंडळाच्या आवारात जोरदार राडा झाला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्ते एकमेकांव तुटून पडले. अंगातील शर्ट फाटेपर्यंत मारामारी झाली. या घटनेने राज्यातील राजकारण आणि समाजमन अस्वस्थ झालं आहे. फक्त मारामारीपर्यंतच हा प्रकार थांबला नाही. तर गुरुवारी मध्यरात्रीनंतरही हा अटक नाट्यावरून चांगलाच राडा झाला.
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
म्हणजे मार… pic.twitter.com/U3Jfnuyzm9— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2025
ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्याच कार्यकर्त्याला पोलीस अटक करत आहेत असा दावा आव्हाडांनी केला. इतकेच नाही तर आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत कार्यकर्त्याला सोडणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली. यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलून नितीन देशमुख यांना दुसऱ्या गाडीतून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. या संघर्षा दरम्यान पोलिसांना आव्हाड यांना खेचून बाहेर काढावं लागलं.
पडळकर- आव्हाडांमध्ये वाद पेटला, विधिमंडळात कार्यकर्ते भिडले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नेमकं काय घडलं होतं ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले होते. यानंतर बुधवारी पडळकर आणि आव्हाड आमनेसामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर आमदार आव्हाड यांनी मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारात एकमेकांना भिडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पडळकरांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तंबाखू मळून दिली
विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनीच तंबाखू मळून दिली वडापाव आणून दिला, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य, मुख्यमंत्री साफसफाई करणार का? विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल