‘ऑक्सिजन जास्त लागतोय, पेशंटला मारून टाक…’ या डॉक्टरला पहिलं उचला, जितेंद्र आव्हाड संतापले

‘ऑक्सिजन जास्त लागतोय, पेशंटला मारून टाक…’ या डॉक्टरला पहिलं उचला, जितेंद्र आव्हाड संतापले

Jitendra Awhad Angry After Udgir Doctor Audio Clip From Corona Viral : उदगीरमधून सुमारे पाच वर्षांअगोदर एक धक्कादायक घटना समोर आली (Udgir Doctor) होती. 2021 मध्ये कोरोना काळात तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकाने दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला फोन केला होता. कोरोनाबाधित एका मुस्लिम महिला रुग्णास मारून टाकण्याची चिथावणी (Corona) दिली होती. याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. वैद्यकीय पेशाला काळिमा फासणारी ही घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

या महिलेच्या पतीने तक्रारीनंतर उदगीर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील संताप व्यक्त केलाय. त्यांनी X पोस्टवर ही घटना शेअर केली आहे.

आई-वडील, लेकरांसह एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या; गाडीच्या काचा बंद केल्या अन्..

मृत पेशंटच्या नातेवाइकांनी तक्रार नोंदवली होती. उदगीर येथील नांदेडनाका परिसरातील कोविड सेंटरमधील डॉक्टरांची कोरोना काळातील एक ऑडिओ क्लिप तब्बल पाच वर्षांनंतर उघडकीस आलीय. एप्रिल 2021 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड मिळत नव्हते. अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर उभारले होते. त्या काळात येथील शासकीय सामान्य रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ. शशिकांत देशपांडे आणि डॉ. शशिकांत डांगे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांच्यात जो संवाद झालाय, त्याची क्लिप आता व्हायरल होतेय.

या ऑडिओ क्लिपमध्ये डॉ. देशपांडे हे डॉ. डांगे यांना नांदेड नाका येथील कोविड सेंटरमध्ये बेड आहेत का? असं विचारतात. त्यावेळी डांगे बेड उपलब्ध नसल्याचं सांगतात. तेव्हा डॉ. देशपांडे ‘दायमीच्या पेशंटला मारून टाक की, कशाला ठेवलेय उगीच, ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला… लई पडलंय’ असे म्हणून जातीवाचक शब्द वापरत असल्याचं समोर येतंय.

धोकेबाज चीन! पाच दहशतवाद्यांना वाचवले; ‘यूएन’मधील कारवायांचा धक्कादायक अहवाल उघड..

यानंतर या दायमी आडनाव असलेल्या मुस्लिम महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर त्या दिवंगत मुस्लिम महिलेचे पती अजमुद्दीन गौसुद्दीन दायमी यांनी डॉक्टर शशिकांत देशपांडे याच्या विरोधात उदगीर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या डॉक्टरला पहिलं उचला, असे याने किती जणांचा मर्डर केला आहे हे समोर येऊ द्या. एवढा द्वेष ह्यांच्या मनात असेल तर, डॉक्टर कशाला बनलास रे बाबा? करायचा ना आपल्या पूर्वजांचा धंदा अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube