मॉरिसने फायर केलेली बंदुक कोणाची? प्लॅन कसा होता? वाचा A To Z
Mauris Noronha : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या 16 तासांतच मारेकऱ्यांना पकडलं आहे. अभिषेक घोसाळकरांवर फायरिंग करणारा मुख्य आरोपी मॉरिस नरोन्हा (Mauris Noronha) उर्फ मॉरिस भाई स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केलीयं, मात्र, गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोळीबार झाल्यानंतर मॉरिस सोडून इतर तीन आरोपींचा गुन्ह्यात समावेश असल्याचं समोर आलं आहे. सध्या तिन्ही आरोपींची चौकशी सुरु आहे. मॉरिसचा अंगरक्षक मिश्राच्या बंदुकीने घोसाळकरांचा घात केला असल्याचं चौकशीत पुढं आलं आहे. आता हे इतर आरोपी नेमके कोण आहेत. त्यांनी गोळीबारासाठी मॉरिसला कशी साथ दिली. याबद्दल सविस्तर जाणून पाहुयात…
पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या आणि सांगा महाराष्ट्र साफ करून द्या; मनसेकडून ‘तो’ व्हिडिओ ट्विट
मुंबईतील दहीसर-बोरिवली परिसरात मॉरिसचं चांगलचं वलय होतं. या वलयामुळे त्याचे अनेकांशी लागेबांधे होते. मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात वैयक्तिक कारणामुळे वाद झाले होते. वादानंतर मॉरिस याने अभिषेक घोसाळकरांसोबत संबंध जुळवून घेतले खरे पण त्यांच्या मनात घोसाळकरांबद्दल खुन्नस कायम होती. हीच खुन्नस अभिषेक घोसाळकरांना समजली नाही आणि त्यांचा घात झाला. कालच्या दिवशी घोसाळकरांना ऑफिसला बोलवून घेतलं. यावेळी मॉरिसचा अंगरक्षक मिश्रा, मेहुल पारीख आणि रोहित साहू हे घटनास्थळी असल्याचं सांगण्यात येतंय.
पोलिसांनीच दिला बोकडबळी! उदगीर पोलिस ठाण्यातील प्रकारानंतर 2 पीआय निलंबित, ८ जणांची बदली
अभिषेक घोसाळकर ऑफिसमध्ये आल्यानंतर मॉरिसभाई आणि साथीदारांनी त्यांचं स्वागत करत एकमेकांबद्ल कौतूक केलं. या भेटीचं फेसबुक लाईव्ह तिथं उपस्थित असलेल्या पारिख आणि साहु यांच्यापैकी एकाने केलं. तर मॉरिसचा अंगरक्षक घटनास्थळीच होता. अवघ्या 4 ते 5 मिनिटांच्या संवादानंतर मॉरिसने अंगरक्षक मिश्राकडून बंदुक घेत घोसाळकरांवर राऊंड फायर केला. यावेळी पाच राऊंडपैकी तीन गोळ्या घोसाळकरांच्या थेट शरीरातच शिरल्या. तीन गोळ्या लागल्याने घोसाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबाराच्या अवघ्या काही मिनिटांनीच मॉरिसभाईनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. दरम्यान, घोसाळकरांच्या हत्येसाठी अंगरक्षक मिश्राची बंदुक वापरण्यात आली असून ही बंदुक परदेशी बनावटीची आहे. ही बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
आता मॉरिसभाईनेही आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र, हा मॉरिसभाई कोण होता, अशी चर्चा रंगू लागली आहे. मॉरिस बोरिवली-दहीसर परिसरातला एक समाजसेवक होता. त्याच्यावर बलात्कार, खंडणी, फसवणूकीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने वार्ड नंबर एकमधून महापालिकेची निवडणूकही लढवली होती. विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत तो राजकीय नेत्यांशी जवळीक साधायचा. अशाच एका कार्यक्रमात अभिषेक घोसाळकरांनी उपस्थिती लावली मात्र, घोसाळकरांची कार्यक्रमाती ही उपस्थिती अखेरचीच ठरली आहे.