पोलिसांनीच दिला बोकडबळी! उदगीर पोलिस ठाण्यातील प्रकारानंतर 2 पीआय निलंबित, ८ जणांची बदली
Udgir Police sacrificed a goat : उदगीर पोलिस (Udgir Police) ठाण्याच्या हद्दीदअपघातांचे प्रमाण आणि गंभीर गुन्ह्यांत वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकडाचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरविंद पवार (Police Inspector Arvind Pawar) आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. तर अन्य 8 कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यातील हा प्रकार चिंताजनक असल्यचाी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष माधव बागवे यांनी व्यक्त केली.
Madhuri Dixit : माधुरीचं नवं फोटोशूट, मनमोहक सौंदर्यांची चाहत्यांना भूरळ
उदगीर हद्दीत गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. यावर उपाय म्हणून एका अधिकाऱ्याने बोकडाचा बळी देण्याचा पर्याय सुचवला. यानंतर पोलिसांनी बोकडाचा बळी देण्याचं ठरवलं. पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बोकड कापण्यात आला. त्यानंतर या बोकडाच्या मटणाची बिर्याणी कण्यात आल्याची माहिती आहे. ही घटन 7 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून अंधश्रध्देला चालना मिळत आहे. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटताच पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पोलिस उपअधीक्षक दिलीप भागवत यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
Haldwani Violence : हल्द्वानी हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू; इंटरनेट ठप्प, शाळा-दुकानेही बंद
भागवत यांनी एक दिवसीय चौकशीचा प्राथमिक अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सुपूर्द केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पवार यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेत सहभागी असलेले पोलिस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात रवानगी करण्यात आली. त्यात बालाजी घारोळे, प्रताप माने, मुबारक मुल्ला, शिवप्रसाद रंगवाळ, माधव केंद्रे, गणेश मिटकरी, बाळासाहेब गडदे, नजीर बागवान यांचा समावेश आहे. या कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी दिले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
चौकशीत ठेवलेला ठपका
पोलिस निरीक्षक अरविंद पवार : कार्याललयीन शिस्तभंग सहा.
पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले: बोकड ठाण्यात आणणे आणि त्याची मेजवाणी देणे.
बालाजी घारोळे, प्रताप माने, मुबारक मुल्ला, शिवप्रसाद रंगवाळ, माधव केंद्रे, गणेश मिटकरी, बाळासाहेब गडदे, नजीर बागवान यांच्यावर बोकड कापणे व पुढील कार्यक्रमात मदत करण्याचा ठपका.