मारकुटा सूरज चव्हाण पोलिसांनी शरण रातोरात जामीनही मंजूर; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण (Suraj Chavan) फरार झाला होता. मात्र आता याच मारकुट्या चव्हाणबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूरज चव्हाण पोलिसांना शरण आला. त्याच्यासह पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. चव्हाण रात्री गुपचूप पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मंजूर झाला. या घटनेनंतर पुन्हा मोठा गदारोळ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, सूरज चव्हाण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर लगेचच पोलिसांनी पुढील कार्यवाही केली. त्यानंतर लगेचच जामिनाची प्रक्रियाही झाली. त्याचा जबाब नोंदवून घेतला गेला. यानंतर सूरज चव्हाण पोलीस ठाण्यातून निघूनही गेला. या घटनेनंतर शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण इतक्यात शांत होईल याची शक्यता कमीच दिसत आहे.
मारकुट्या सूरज चव्हाणला दादांचा धक्का; त्वरीत राजीनामा देण्याचे अजित पवारांचे आदेश
नेमकं काय घडलं होतं
काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांत वाद झाला होता. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांच्या टेबलवर पत्ते फेकण्यात आले. या प्रकाराने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली होती.
या मारहाणीच्या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. या प्रकारावर खुद्द अजित पवार यांनीच नाराजी व्यक्त केली होती. तत्काळ सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास सांगतिले. काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो, असं अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले होते.
सूरज चव्हाणचा माफीनामा
लातूर शहरामध्ये काल छावा संघटनेचे (Chhava Sanghatana) कार्यकर्ते अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडासा वाद निर्माण झाला. काही असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे काही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर झाला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलांना आम्ही मारहाण केली, अशा चर्चा सुरू आहेत. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला, तर त्याच्या पाठीशी उभं राहणे, मी माझं कर्तव्य समजतो. त्या ठिकाणी आमच्या नेतृत्वाबद्दल असंवैधानिक शब्द वापरला. त्यामुळे आमच्याकडून तशा पद्धतीची कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे सूरज चव्हाणने एका पोस्टमध्ये म्हटले होते.
छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण, लातूर बंद; सूरज चव्हाण यांचा माफीनामा