मारकुट्या सूरज चव्हाणला दादांचा धक्का; त्वरीत राजीनामा देण्याचे अजित पवारांचे आदेश

Ajit Pawar Instructions Suraj Chavan To Resign : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून सूरज चव्हाण (Suraj Chavan) आक्रमक झाले होते. ही घटना लातूरमध्ये घडली होती. त्यानंतर राज्यात मोठं तणावाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे.
पदाचा त्वरित राजीनामा
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
घटना अत्यंत गंभीर
काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो, असं अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे.
मोक्काचे आरोपी भाजपला चालतात? रविंद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्रीयत्व जागं असलेले सर्वजण…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय.
ऑपरेशन सिंदूर ते अंतराळात फडकला तिरंगा; अधिवेशनाच्या सुरूवात काय म्हणाले पीएम मोदी?
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 21, 2025