सुरज चव्हाण आणखी अडचणीत, झापूक झुपूक डॉयलॉग चोरल्याचा इन्फ्लुएंन्सरचा दावा

Suraj Chavan in more trouble, influencer claims he stole the dialogue Zhapuk Zhapuk :रील स्टार म्हणून त्याच्या हटके स्टाईलने फेमस झालेला सुरज चव्हाण आता थेट चित्रपटामध्ये पोहोचला आहे. त्याच्या वेगवेगळ्या डायलॉग ने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं नुकताच त्याने झापून या चित्रपटांमध्ये काम केलं या चित्रपटाचे शीर्षक देखील त्याच्याच डायलॉग ने ठेवण्यात आला आहे. मात्र यावरूनच आता वाद निर्माण झाला आहे. कारण झापूक झुपूक डायलॉग सुरजने चोरला असल्याचा आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर सागर शिंदे याने केला आहे. हा माझा डायलॉग असल्याचे त्याने दावा केलाय.
सागर शिंदे बद्दल सांगायचं झालं तर सोशल मीडियावर रावडी नेता या नावाने तो आपलं पेज आणि चॅनल चालवतो. तर सुरज चव्हाणने आपला डायलॉग चोरला असं त्याचं म्हणण आहे. यावर बोलताना सागर शिंदे म्हणाला की, मी लहानपणापासून डीजे आणि साऊंड सिस्टिमचा चाहता आहे. मी नेहमी साऊंड झापूक झुपूक वाजतोय असं म्हणायचं माझ्या याच डायलॉगवर 2022 मध्ये दहीहंडीच्या व्हिडिओमध्ये रिमिक्स गाणे देखील वाजवण्यात आले आहेत. मात्र तेव्हा तो फारसा चालला नाही त्याचाच रीक्रिएट व्हिडिओ 2023 मध्ये आला आणि तो प्रचंड व्हायरल झाला.
बदनाम करण्यासाठी विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न…कर्ज घोटाळा प्रकरणावरून विखेंचा विरोधकांवर पलटवार
सुरजने देखील माझा हाच व्हिडिओ पाहिला. त्यानंतर त्याने हा डायलॉग म्हणत एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्याच वेळी त्याने मला फॉलो देखील केलं होतं. मात्र त्याने काही दिवसांनी हा व्हिडिओ पेजवरून काढून टाकला. मात्र त्यानंतर बिग बॉसमध्ये ज्यावेळी रितेश देशमुख यांनी हा डायलॉग सुरजला म्हणायला लावला. त्याबद्दल त्यांनी विचारणा केली. त्यावेळी सुरज ने हा डायलॉग आपलाच असल्याचा आपल्याला असाच सुचल्याच म्हटलं. मात्र तो खोटं बोलला. हा डायलॉग माझा आहे आणि हा सूरजने चोरला आहे. असा दावा शिंदे यांनी केला आहे.