“अजितदादांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, आम्ही तटकरेंना”, मारकुट्या सूरज चव्हाणच्या प्रमोशनवर घाडगे भडकलेच

“अजितदादांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, आम्ही तटकरेंना”, मारकुट्या सूरज चव्हाणच्या प्रमोशनवर घाडगे भडकलेच

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात काल एक घडामोड घडली. ज्याचे पडसाद आज उमटू लागले आहेत. अजित पवार यांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना (Vijay Ghadge) मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी (Suraj Chavan) दिली. विशेष म्हणजे या सूरज चव्हाणला पक्षातून स्वतः अजित पवार यांनी निलंबित केलं होतं. मात्र महिनाभराच्या आतच सूरज चव्हाणचं पुनर्वसन करण्यात आलं. या घडामोडीवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. तर आता छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. सूरज चव्हाणचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. अजित पवारांच्या भूमिकेस हे नक्कीच योग्य नाही, असे विजय घाडगे म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले विजय घाडगे?

मला झालेल्या मारहाणीला अवघा एक महिनाही झाला नसताना सूरज चव्हाण यांना अशा पद्धतीने पद्धतीने प्रमोशन देणे योग्य आहे का? अशी मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नाही असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मग अजित पवारांच्या भूमिकेला डावलून सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांचे पुनर्वसन केले का? असे प्रश्न आता निर्माण होत आहेत. सुनील तटकरे यांना येणाऱ्या काळात राज्यात फिरताना नक्कीच छावा विरोध करेल असा इशारा विजय घाडगे यांनी दिला.

नेमकं प्रकरण काय ?

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळात रमी खेळत असतानाचा मंत्री कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कोकाटे यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. याच दरम्यान खासदार सुनील तटकरे लातुरात आले होते. येथे कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कोकाटे यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले.

मारकुट्या सूरज चव्हाणचं महिन्याआधीच प्रमोशन, NCP सरचिटणीसपदी नियुक्ती; दमानिया संतापल्या

हा प्रकार पाहून संतापलेल्या सूरज चव्हाणने मागचा पुढचा कोणताही विचार न कराता कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. अगदी लाथाबुक्क्यांचा वर्षाव करण्यात आला. या घटनेनंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाणची तत्काळ हकालपट्टी केली होती. ही घटना 20 जुलै रोजी घडली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी चव्हाणचा राजीनामा घेतला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube