Phaltan Case : मृत महिला डॉक्टरने प्रशांतला प्रपोज केलं होतं; आरोपी बनकरच्या बहिणीचा दावा

Phalatan deceased female doctor Case नंतर आता आरोपी बनकरच्या बहिणीने दावा केला आहे की, मृत महिला डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केलं होतं.

Letsupp (11)

The deceased female doctor proposed to Prashant; Accused Banker’s sister claims in Phalatan Case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलीस प्रशासनासह लोकप्रतिनिधी विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता आरोपी बनकरच्या बहिणीने दावा केला आहे की, मृत महिला डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केलं होतं.

आरोपी बनकरच्या बहिणीचा दावा…

यावेळी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना आरोपी बनकरच्या भावाने सांगितलं की, माझा भाऊ स्वत: हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. त्या अगोदर शुक्रवार पासूनच पोलिसांनी मला आणि माझ्या वडिलांना पोवलिस स्टेसनमध्ये थांबवून ठेवलं होतं. तर बनकरच्या बहिणीने सांगितलं की, मृत महिला डॉक्टर फलटणमध्ये एक वर्षांपूर्वी राहायला आल्या होत्या. त्यांची आणि माझी चांगली ओळख आणि मैत्री झाली होती. त्यामुळे त्या माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करत होत्या. मी त्यांच्या सरकारी नोकरीसाठी त्यांचं कौतुक करत असे तेव्हा त्या ही नोकरी तणावाची असल्याचं म्हणत होत्या.

Phaltan Case : खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए सर्वांना… फलटण प्रकरणात धसांची एन्ट्री

तसेच त्या नेहमी तणावाखालीच राहत होत्या. प्रशांतला सुरूवातीला चांगलं ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी त्याला प्रपोज केलं होतं. त्यावर त्याने, ‘नाही तुम्ही मला दादा म्हणता, मी तुम्हाला घरच्या सारखं मानतो’. असं म्हणत नकार दिला होता. त्यानंतर त्यांचा संबंध देखील नव्हता. तसेच त्यांचे आई-वडील देखील आमच्या घरी येऊन राहिले होते. त्यांचे देखील आमच्या घरी येणे-जाणे होते. मात्र त्यांनी आत्महत्येनंतर माझ्या भावाचं नाव का लिहिलं? हे माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळावा. असा दावा आरोपी बनकरच्या बहिणीने दावा केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये या मृत महिला डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये खासदाराचे पीए तिच्यावर दबाव टाकत होते. त्यांनी खासदारांना फोन लावून दिला असता त्यांनी देखील तिच्याशी बोलने केले होते. असा आरोप केला आहे.

Phaltan Doctor Suicide Case : दानवेंनी पीएंची नावं जाहीर करत सांगितलं खासदाराचं कनेक्शन

दरम्यान यात संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांनी संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर, बनकरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.त्यानंतर आता थेट फलटण भागातील खासदारांचे नाव देखील यामध्ये या महिला डॉक्टरच्या भावाने केले आहे. त्यामुळे नाव न समोर आलेले हे खासदार कोण? अशा अनेक प्रश्नांना या प्रकरणाने तोंड फोडले आहे.

follow us