Phaltan Doctor Suicide Case : दानवेंनी पीएंची नावं जाहीर करत सांगितलं खासदाराचं कनेक्शन
Ambadas Danave यांनी फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी थेट आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Phaltan doctor suicide case Ambadas Danave announce names of PAs, demand Fadnavis’ resignation : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलीस प्रशासनासह लोकप्रतिनिधी विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप आणि गुन्हेगारांना मदत केल्याचे दावे केले जात आहेत. त्यात आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी थेट आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, या महिला डॉक्टरचा फिटनेस सर्टीफिकेटसाठी खासदाराच्या पीए आणि पोलिस अधिकाऱ्याकडून छळ करण्यात आला. या महिलेने तिच्या पत्रात फलटणमधील भाजापच्या माजी खासदारांचा उल्लेख केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभाग सांभाळतात. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांनी राजीनामा देणे आवश्यक आहेत.
तसेच या पीए अनिल महाडिकला बेड्या ठोकल्या पाहिजेत त्यांची नुकतीच बदली देखील करण्यात आली आहे. तसेच राजेंद्र शिंदे आणि नाग टीळक हे माजी खासदारांचे पीए आहेत. यांनीच महिला डॉक्टरचं खासदारांशी बोलणं करून दिलं त्यांच्यावर दबाव आणला. याच खासदारांचा भाऊ असलेल्या अभिजीत राजे नाईक निंबाळकर हे देखील या भागात अधिकाऱ्यांवर दबाव आणि दहशतक निर्माण करण्याचं काम करतात. असा आरोप पुन्हा एकदा दानवे यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये या मृत महिला डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये खासदाराचे पीए तिच्यावर दबाव टाकत होते. त्यांनी खासदारांना फोन लावून दिला असता त्यांनी देखील तिच्याशी बोलने केले होते. असा आरोप केला आहे.
Phaltan Case : मृत डॉक्टर तरुणीने ज्यांच्याकडे तक्रार केली होती ते डॉ. धुमाळ काय म्हणाले?
दरम्यान यात संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांनी संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर, बनकरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.त्यानंतर आता थेट फलटण भागातील खासदारांचे नाव देखील यामध्ये या महिला डॉक्टरच्या भावाने केले आहे. त्यामुळे नाव न समोर आलेले हे खासदार कोण? अशा अनेक प्रश्नांना या प्रकरणाने तोंड फोडले आहे.
