बॅगमध्ये रिव्हॉल्वर अन् काडतुसे राष्ट्रवादीचा नेता अडचणीत; पुणे विमानतळावर उघडकीस आला प्रकार
NCP Leader Chandrakant Bagal हे सोबत रिव्हॉल्वर आणि काडतुसे बाळगल्याने अडचणीत आले. पुणे विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान ही घटना उघडकीस आली.

NCP Leader Chandrakant Bagal in trouble due to Carring revolvers and cartridges in bag on Pune Airport : पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ज्येष्ठ नेते चंद्रकांत प्रभाकर बागल (वय 63, रा. गादेगाव, जि. सोलापूर) हे विमान प्रवासादरम्यान आपल्या सोबत रिव्हॉल्वर आणि काडतुसे बाळगल्याने अडचणीत आले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा तपासणीदरम्यान ही घटना उघडकीस आली.
अखेर उत्सुकता संपली! ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘कांतारा: चैप्टर 1 ‘चा दमदार ट्रेलर प्रदर्शित!
सीआयएसएफ आणि विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगेत भारतीय बनावटीचा रिव्हॉल्वर, पाच जिवंत काडतुसे आणि एक रिकामे काडतूस आढळून आलं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन विमाननगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. ही कारवाई रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास झाली.
हातात गुलाब, अन् पांढरी साडी; तेजस्विनी लोणारीची अदाकारी पाहिलीत का?…
विमानतळ प्राधिकरणाच्या तक्रारीवरून विमाननगर पोलिसांनी बागल यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत असे समोर आले की, त्यांच्याकडे या शस्त्राचा परवाना आहे, मात्र तो परवाना फक्त महाराष्ट्र राज्यापुरता वैध आहे. वाराणसीकडे प्रवास करताना आवश्यक मंजुरी न घेतल्याने नियमभंग झाल्याचं स्पष्ट झालं.
गजेंद्र अहिरे यांचा ‘कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्काराने सन्मान…
याप्रकरणी पोलिसांनी त्यांचं शस्त्र जप्त केलं असून पुढील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार परवान्याच्या अटींचं उल्लंघन असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Mardani 3 : नवरात्रीच्या मुहूर्तावर ‘मर्दानी 3’ चं नवं पोस्टर प्रदर्शित…
चंद्रकांत बागल हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी 2014 मध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. यापूर्वी ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत.