माझ्या बाळाला जिवंत करा! नवजात बाळाचं शव पिशवित घालून नेत पित्याचा डीएम ऑफिसमध्ये आक्रोश; अधिकारी झाले सुन्न

Bring my baby back to life! Father cries in DM office after carrying newborn baby’s body in a bag; Officers are stunned : गेल्या काही दिवसांपुर्वी पुण्यामध्ये तनिषा भिसे या गर्भवतीवर रूग्णालयाने पैशांची तजवीज न केल्याने तात्काळ उपचार न केल्याने तिला तिचा जीव गमवावा लागल होता. याच घटनेची पुनरावृत्ती उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या जिल्ह्यामध्ये झाली आहे. या घटनेमध्ये रूग्णालयाने वेळेत उपचार न दिल्याने एका दाम्पत्याला त्यांचं नवजात बाळ गमवावं लागलं आहे. या पित्याने बाळाला पिशवित घालत थेट डीम ऑफिसमध्ये नेलं आणि आपलं बाळ जिवंत करा म्हणत आक्रोश केला.
नेमकी घटना काय?
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या जिल्ह्यामध्ये भिरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भानपूर गावातील राहिवासी विपीन गुप्ता यांची पत्नी गर्भवती होती. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर महेवागंज येथे गोलदरा रूग्णालायत दाखल केले. मात्र यावेळी रूग्णालयाने नॉर्मल डिलिव्हरीसाठी 10 हजार रूपये, ऑपरेशनसाठी 12 तर मोठ्या ऑपरेशनसाठी 25 हजारांची मागणी करण्यात आली. मात्र या दाम्पत्याकडे असलेले 8 हजार त्यांनी भरले पण त्यांच्याकडे उर्वरित पैसे नव्हते. पण प्रसुतीकाळ जवळ येत होता. तरी देखील रूग्णालयाने अमानुषपणे उपाचार सुरू केले नाही.
जय शाह तुमचा कोण, क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का? ; भाजपवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
त्यामुळे या कुटुंबाने या गर्भवतीला दुसऱ्या रूग्णालयात हलविले पम तो पर्यंत उशीर झालेला होता. त्यामुळे या महिलेला तिचं बाळ गमवावं लागलं आहे. पण तिला हे ऐकून धक्का बसेल म्हणून ही गोष्ट या महिलेला तिच्या पतीने सांगितलेली नव्हती. त्याने नवजात बाळाला पिशवित घालत थेट डीम ऑफिसमध्ये नेलं आणि आपलं बाळ जिवंत करा म्हणत आक्रोश केला. माझ्या पत्नीला ही गोष्ट माहिती नाही. ती बाळ मागते आहे. या घटनेने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.
दरम्यान या घटनेनंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गुप्ता आणि एसडीएम सदर अश्वीनी कुमार सिंह यांनी रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर कारवाई सुरू करत डीएमच्या आदेशानुसार हे रूग्णावल सील करण्यात आलं आहे. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये रूग्णालय आणि प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका निष्पाप बाळाचा बळी घेतल्याचा प्रकार सुरू असल्याची टीका होत आहे.