जय शाह तुमचा कोण, क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का? ; भाजपवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

जय शाह तुमचा कोण, क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का? ; भाजपवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray On BJP : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये पाकिस्तानविरुद्ध 14 सप्टेंबर (INDvsPAK) रोजी खेळणार आहे. मात्र त्यापूर्वी देशात यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. एआयएमआयएमचे (AIMIM) खासदार आणि प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ससंदेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान बोलताना भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी केली होती. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणावरुन मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज कबुतरांसाठी लोक रस्त्यावर उतरत आहे. कुत्रे आणि हत्तीसाठी उतरतात ही चांगली बाब आहे, पण पहलगामवेळी माणुसकी कुठं जाते? गरम सिंदूर वाहत असल्याचे बोलतात आणि देशाची टीम पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच जय शाह तुमचा कोण लागून गेला? आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का? असे प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या सैनिकांनी शौर्य गाजवून भाजप त्यांचे श्रेय घेत आहे. सोफिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्यांना आतंकवाद्यांची बहीण म्हणणारे भाजपचे गधडे आहेत. आपलं शिष्टमंडळ गेलं, पण एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला का? आता पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार का? असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

कोकणच्या लाल मातीत , मनात कोरला जाणारा ‘दशावतार’; संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा 

भाजप बोगस जनता पार्टी

तर या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मतचोरीच्या आरोपांवरून भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ही बोगस पार्टी आहे, मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या, हे सगळं चालले आहे, प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाही. जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी ढोंग उघडे पाडले. अशी टीका या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube