क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी नवजात बालिकेला धुळे प्रशासनाचा आधार

धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सिव्हिल हॉस्पिटल तसेच शिशुविहाराला भेट दिली.

News Photo   2026 01 03T151331.174

धुळे जिल्हा प्रशासनाने एक संवेदनशील आणि माणुसकीचा (Dhule) संदेश देत एका चार दिवसांच्या बालिकेला आधार दिला आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, स्त्रीमुक्ती चळवळीच्या संस्थापक यांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राबविल्या या उपक्रमामुळे धुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे कौतुक होत आहे.

एक जानेवारी २०२६ रोजी धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मंदिरात अवघ्या तीन ते चार दिवसांच्या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला अज्ञात महिलेने सोडून दिल्याची घटना घडली होती.  मंदिरातील पुजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबंधित बालिकेला धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

पोलिसांनाच तपास करायचा नाही म्हणून त्यांनी. धुळे रोकड प्रकरणी अनिल गोटेंचा घणाघात

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने त्या निरागस बालिकेची पाहणी व चौकशी करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सिव्हिल हॉस्पिटल तसेच शिशुविहाराला भेट दिली.

या भेटीद्वारे प्रशासन या बालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी व भविष्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, हा संदेश देण्यात आला. स्त्रीशिक्षण आणि स्त्रीहक्कांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी नवजात बालिकेच्या संरक्षणासाठी प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

follow us