Video : पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात भूमिका घेतली तरच…, शिवराज बांगर यांची वादळी मुलाखत

Shivraj Bangar on Pankaja Munde, Dhananjay Munde : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटला. त्यामध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबाबत अनेक अंगाने बोललं गेलं आहे. (Munde)त्यावरून आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर आता बीडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. ते लेट्सअपवर विशेष मुलाखतीत बोलत होते.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे या 2014 ते 2019 बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यांच्या कार्यकाळात कधीच काही घडलं नाही. त्यांच्याकडून कुणावर अन्याय झालाय का? तर असंही काही झालेलं नाही असं म्हणत त्यांच्या कामाचं कौतूक करत त्यांनी काय करावं याबद्दलही बांगर यावेळी बोलले आहेत. त्याचबरोबर, पंकजा मुंडे यांनी कुणाच काही वाईट काम केलंय किंवा कुणाला त्रास दिलाय असंही एकही उदाहरण सापडणार नाही असंही ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय तक्रार असू शकते तर त्यांनी कुणाची बदली केली नाही, कुणाचं काही काम केलं नाही अशी तक्रार असून शकते पण त्यांनी अन्याय केलाय असं अजिबात म्हणता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात म्हणण्यापेक्षा गुन्हेगारीच्या विरोधात भूमिका घ्यावी असंही यावेळी बांगर म्हणाले आहेत. तसंच, आज जे बीड जिल्ह्यात होत आहे त्यामध्ये पंकजा मुंडे यांनी यामध्ये काही केल नसून धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यामुळे हे घडलं आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
धनंजय मुंडे आणि माझे चांगले संबंध असताना आम्ही बोलत असू. आता काही वर्ष झालं आमचं बोलण नाही. तसंच, मी कोण आहे हेही पंकजा मुंडे यांना माहित आहे की नाही हे मला माहित नाही. मी पंकजा मुंडे यांना कधी भेटलोही नाही. त्यामुळे आपले त्यांच्याशी काही राजकीय संबंध आहेत का? तर असे काही नाहीत असंही शिवराज बांगर यावेळी म्हणाले आहेत. तसंच, धनंजय मुंडे किंवा इतरांनी जे काही जिल्ह्यात सुरू केलय ते सगळ थांबवण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी बोलाव अशी भूमिकाही बांगर यांनी यावेळी मांडली.