Video : माझं अन् वाल्मिक कराडचं ‘त्या’ घटनेमुळ खटकलं; बाळा बांगरची वादळी खुलाशांची मुलाखत

Bala Bangar on Walmik Karad : मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बीड जिल्हाध्यक्ष होतो. त्या काळात वाल्मिक कराड आणि आमचा संपर्क आला. आम्ही चांगले सहकारीही होतो. मात्र, आमच्यात सुप्त संघर्ष होता. (Karad) तो पुढे उघड सुरू झाला. कारण, लोकांचे जीव घेणं, कुणाचं आयुष्य उध्द्वस्थ करण हे काही मला मान्य नव्हत म्हणून मी दूर झालो असं सांगत सध्या बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि गँगची माहिती महाराष्ट्रासमोर मांडणारे बाळा बांगर यांनी लेट्सअप मराठीला मुलाख दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
वाल्मिक कराडच्या नाही तर मी पोलिसांच्या कचाट्यात सापडलो. आणि जिल्ह्यात कराडची टोळी ही दुसरी-तिसरी कुणी नसून पोलिसांची मोठी टोळीच वाल्मिक कराडसाठी काम करते असा धक्कादायक दावा बाळा बांगर यांनी केला आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडने आपल्याला तु गप्प रहा, तुझ्याशी माझ चांगलं आहे, तुला बाकीच काय करायचय असं म्हणून मला गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण काही गप्प बसणाऱ्यातले आणि घाबरणाऱ्यातले नाहीत असंही बाळा बांगर यावेळी म्हणाले.
वाल्मिक कराडची राखच बाहेर येईल!; बाळा बांगर यांचे खळबळजनक विधान
यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंगही सांगितला. बाळा यांना मुंबईला घेऊन गेल्यानंतर शेजारी बंदूक ठेऊन तू विरोधात जाऊ नको नाहीतर तुला परवडणार नाही अशी धमकी देत एकतर तु सोबत राहा किंवा गोळी घालून घे असं वाल्मिक कराड आपल्याला म्हटला असंही बाळा बांगर यांनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर, त्याने किती क्रुर पद्धतीने लोकांशी व्यवहार केले आहेत तेही त्यांनी यावेळी सांगितले आहेत. तसंच, बाळा बांगर यांनी बीड पोलीस कस कराडसाठी काम करतात हेही यावेळी सांगितलं आहे.
यावेळी बाळा बागंर म्हणाले, पोलीस विभागातील एसपीपासून ते खाली पोलीस शिपायापर्यंत सगळेच वाल्मिक कराडच ऐकतात.. त्यामुळे मी वाल्मिकच्या कचाट्यात नाही तर पोलिसांच्या कचाट्यात सापडलो होतो. तसंच, पोलिसांच्या कचाट्यात मला वाल्मिकनेच घातलं होत. माझ्यावर ऐकून सात केस दाखल केल्या होत्या. त्यामध्ये हापमर्डरचीही केस टाकली असा दावा करून आपल्याला पूर्णपणे गुतवायचा प्लॅन कराडने केला होता असंही बाळा बांगर यावेळी म्हणाले आहेत. तसंच, एक पत्रकार परिषद घेऊन आपण आणखी मोठे मोठे खुलासे करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.