Video : धनुभाऊंच्या PA चा मर्डर करायचा; कराडच्या पूर्वाश्रमिच्या सहकाऱ्याने कुंडली मांडत बिंग फोडलं!

Video : धनुभाऊंच्या PA चा मर्डर करायचा; कराडच्या पूर्वाश्रमिच्या सहकाऱ्याने कुंडली मांडत बिंग फोडलं!

Bala Bangar on Walmik Karad : बीड जिल्ह्यात मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ वातावरण तापलं. ते प्रकरण आणखीही धगधग आहे. त्यामध्ये आरोपी अटक आहेत. (Karad) माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराडही अटक आहेत. आता त्यांचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज माध्यमांसमोर येत खळबळजनक आरोप केले आहेत.

वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांना देखील मारायचे होते, असा आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसंच, धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांनी वाल्मीक कराडचा फोन न उचलल्याने त्याचा इगो हर्ट झाला आणि त्याने मला सांगितलं की, आता प्रशांत जोशी याचा काटा काढायचा आहे. मी वाल्मिकला अनेक वेळा समजावून सांगितलं, असा धक्कादायक खुलासा बाळा बांगर यांनी केला आहे.

इथं बाप बसलाय वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

त्याचबरोबर बाळा बांगर यांनी कुणा-कुणाला त्रास दिला. आपल्या आईला अटक केली याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, माझ्यासमोर वाल्मीक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मिक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा थेट गौप्यस्फोट बांगर यांनी केलाय.

मी वाल्मीक कराडचं काम करत नसल्याने आणि त्याचं ऐकत नसल्याने त्याने माझ्यासमोर पिस्तूल ठेवली आणि मला म्हणाला गोळी झाडून घे, किंवा तुझ्या शैक्षणिक संस्था मला दे नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा टाकून तुला अडकवतो असंही बागंल म्हणाले. त्याचबरोबर वाल्मिक कराडची एक कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकवली, त्यामध्ये कराड हा शिविगाळ करताना दिसत आहे. आता या प्रकरणामुळं वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याचं बोलल जातय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube