गोट्या गित्ते हा सायको किलर, अनेक मोठ्या गुन्ह्यांत त्याचा हात; बाळा बांगरचा मोठा आरोप

गोट्या गित्ते हा सायको किलर, अनेक मोठ्या गुन्ह्यांत त्याचा हात; बाळा बांगरचा मोठा आरोप

Bala Bangar : बीडमधील महादेव मुंडे ( Mahadev Munde) हत्याप्रकरणात सध्या पोलिसांकडून (Beed Poloce) गोट्या गित्तेचा (Gotya Gitte) शोध घेतला जात आहे. मात्र, तो फरार आहे. शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये गोट्या गित्तेने थेट रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा दिला आहे. दरम्यान, बाळा बांगर (Bala Bangar) यांनी गोट्या गित्तेवर मोठा आरोप केला.

विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 4 दिवसांत राज्यभरात पावसाची हजेरी 

गोट्या गित्ते हा सायको किलर आहे. छोट्या गुन्ह्यापासून ते मोठ्या गुन्ह्यांपर्यंत त्याचा हात आहे. गोट्या गित्तेवर मोक्का अंतर्गत अटक करायला पाहिजे होती, असं बाळा बांगर यांनी म्हटलं.

बाळा बांगर यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, गोट्या गित्ते हा सायको किलर आहे. छोट्या गुन्ह्यापासून ते मोठ्या गुन्ह्यांपर्यंत त्याचा हात आहे. गोट्या गित्तेल मोक्का अंतर्गत अटक करायला पाहिजे होती. मी सांगत होतो, त्यावेळेला गोट्या परळीतच होता. पण, पोलिसांनी त्यावेळी कारवाई केली नाही. आता किती वेळ पुढे निघून गेली आहे. तो व्हिडिओ व्हायरल करतोय आणि आपण पाहतोय. गोट्या गित्तेचं किर्तन ऐकायची वेळ आली, असं बाळा बांगर यांनी म्हटलं.

नवीन पदाधिकाऱ्यांची काँग्रेस घेणार कार्यशाळा, वेळ अन् ठिकाणही ठरलं; वाचा डिटेल.. 

आव्हाडांच्या घराची रेकी…
पुढं ते म्हणाले, गोट्या गित्तेनं आणि वाल्मिक कराडच्या तांदळे नामक गुंडान सुरेश धस, बाळा बांगर अन् जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गोट्या गित्ते आणि तांदळे नामक गुंडाने वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार, मागच्या ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये मुंब्र्यामध्ये जाऊन रेली केली होती, असंही बांगर यांनी म्हटलं.

रास्ता रोको आंदोलनाला तुम्ही याचयं नाही, आलात तर आमच्याशी गाठ आहे, अशी फोनवरून श्री कराडच्या बॉडीगार्डने मला धमकी दिली. हे मी परळीत सांगितल्यावर कन्हेरवाडी आणि परळीतील लोकांनी वाल्मिकर कराडच्या घरावर हल्ला केला. परळी पोलिसांनी हे अंधारात ठेवले. वाल्मिक कराडे पोरं आणि बॉडीगार्ड घरात लपून बसले होते. वाल्मिक कराडचं काय राहिलं? परळीतील लोक त्यांच्या घरात घुसले, असंही बाळा बांगर यांनी म्हटलं.

श्री कराड परदेशात जाण्याच्या प्रयत्नात…
मला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्री कराड भूतान, नेपाळमधून इतर देशांमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पंकज कुमावत हे श्री कराड आणि वाल्मिक कराडच्या टोळीला पाताळातून पण शोधून काढतील. परळीतल्या घरा-घरात माहित आहे, महादेव मुंडेंची हत्या कोणी केली, असंही बाळा बांगर यांनी म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube