विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 4 दिवसांत राज्यभरात पावसाची हजेरी

विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 4 दिवसांत राज्यभरात पावसाची हजेरी

Maharashtra Weather Update : राज्यात अनेक ठिकाण पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पावसासाठी (Maharashtra Weather Update) अनुकूल वातावरण तयार होऊ लागले आहे. हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील (IMD Rain Alert) काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडसह विदर्भातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पुढील चार दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यावेळी ढगाळ हवामान राहिल तसेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. याव्यतिरिक्त हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस होईळ असा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल त्यानंतर मात्र पाऊस विश्रांती घेईल.

मुसळधार पावसाचा कहर! मृतांचा आकडा 30 पार, 80 हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

चार दिवसांत अनेक ठिकाणी बरसणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. 4 ऑगस्ट रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. 5 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर अणि सांगली जिल्ह्यांत पाऊस होईल. 6 ऑगस्ट रोजी बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच आठवड्यात मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. आता पुन्ही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अहिल्यानगरकरांनो लक्ष द्या! जोरदार पाऊस होणार; हवामान विभागाने जिल्ह्यासाठी दिला येलो अलर्ट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube