Nanded Market Committee Election: भाजपला मोठा धक्का; 5 बाजार समितीमध्ये ‘मविआ’चा विजय

Nanded Market Committee Election: भाजपला मोठा धक्का; 5 बाजार समितीमध्ये ‘मविआ’चा विजय

Nanded Market Committee Election : नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समित्यांच्या (Nanded Market Committee Election) निवडणुकांचे निकाल आत्ता हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. मुखेड बाजार समिती (Mukhed Market Committee ) वगळता इतर सर्व जागांवर भाजप-महायुतीला (bjp) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. सर्वांत धक्कादायक निकाल हा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा लागला आहे. (Nanded Bazar Committee Election, Maha Vikas Aghadi wins and BJP loses)

मुखेड बाजार समितीच्या 18 पैकी 12 जागा जिंकून भाजपने बहुमत मिळवले आहे. उमरी बाजार समितीत महाविकास आघाडीने 18 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत.

महाविकास आघाडीला 18 पैकी 17 जागा मिळाल्या आहेत तर भाजपला बिलोलीची एक जागा मिळाली आहे. कोंदळवाडीतही 18 पैकी 17 जागा मविआने तर एक जागा भाजपने जिंकली आहे. माहूरमध्ये 18 पैकी 14 जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठाच्या गटाच्या युतीने जिंकल्या आहेत. भाजप-काँग्रेस आघाडीला 4 जागा मिळाल्या.

लोहा बाजार समितीत चिखलीकरांच्या पॅनलचा पराभव

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा बाजार समितीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटालाही पराभवाचा सामना करावा लागला. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी काल मतदान झाले. या निवडणुकीत 98 टक्के मतदान झाले. येथे खासदार चिखलीकर आणि त्यांचे दाजी तथा शेकापचे आमदार श्याम सुंदर शिंदे यांचे पॅनल होते. त्यामुळं दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 18 पैकी 16 जागा जिंकल्या. दाजी आणि मेहुण्याच्या लढाईत दाजी वरचढ ठरले.

दरम्यान, या विजयानंतर लोहा शहरात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांकडून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

निकाल :

उमरी- 18 पैकी 18 जागा मविआ

बिलौली – 18 जागांपैकी 17 जागा मविआ, 1 भाजप

कोंडलवाडी – 18 पैकी 17 जागा मविआ, 1 जागा भाजप

माहूर – 18 पैकी 14 जागा राष्ट्रवादी आणि उबाठा आघाडी, 4 जागा भाजप-काँग्रेस युती

लोहा – 18 पैकी 16 मविआ, 02 जागा भाजप

मुखेड- 18 पैकी 12 जागा भाजपच्या वाट्याला, मतमोजणी सुरू

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube