नवीन पदाधिकाऱ्यांची काँग्रेस घेणार कार्यशाळा, वेळ अन् ठिकाणही ठरलं; वाचा डिटेल..

नवीन पदाधिकाऱ्यांची काँग्रेस घेणार कार्यशाळा, वेळ अन् ठिकाणही ठरलं; वाचा डिटेल..

Pune News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले (Congress Party) उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला (Pune News) येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त (Maharashtra Congress) पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे 10 ऑगस्ट रोजीच या कार्यशाळेसाठी पुण्यात पोहोचणार आहेत.

काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हजारो शिवसैनिकांचा ठिय्या; नेमकं प्रकरण काय?

10 ऑगस्ट रोजी सांयकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी या कार्यशाळेसाठी निमंत्रीत पदाधिकऱ्यांची नोंदणी होईल. 11 ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थनेने शिबिराची सुरुवात होईल. त्यानंतर 10 वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

नेते आणि वक्त्यांचे मार्गदर्शन, विविध चर्चासत्रेही होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकही होणार आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने या कार्यशाळेची समाप्ती होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

रायगडात काँग्रेसला धक्का! माजी आमदार पुत्र हाती बांधणार घड्याळ; मुहूर्तही ठरला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube