गजेंद्र अहिरे यांचा ‘कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्काराने सन्मान…
गजेंद्र अहिरे यांचा 'कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात आला असून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

kamal Shendge Rangkarmi Award : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेचा अकरावा वर्धापन दिन मुलुंड येथील सु.ल. गद्रे सभागृहात पार पडला. यावेळी गजेंद्र अहिरे यांचा स्व. कमल शेडगे (kamal Shendge Rangkarmi Award) यांच्या नावाने रंगकर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार अहिरे यांना देण्यात आला.
पाकडे सुधारणार नाहीच! अर्धशतकानंतर फरहानची गोळीबार स्टाईल, नेटकऱ्यांचा संताप…
यावेळी बोलताना गजेंद्र अहिरे म्हणाले, मराठी रंगभूमी ही केवळ करमणुकीचं माध्यम नसून ती समाजाशी थेट संवाद साधण्याचं प्रभावी साधन आहे. त्यांच्या या सन्मानामुळे नाट्यवर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्यापासून नवीन GST दर लागू : काय बदल होणार, सोप्या भाषेत जाणून घ्या…
गजेंद्र अहिरेर यांचं सध्या चर्चेत असलेल्या “शेवग्याच्या शेंगा” नाटकाला प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर विशेष प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, सूक्ष्म मानवी नातेसंबंध आणि हळुवार विनोद या सगळ्यांचं सुरेख मिश्रण असलेल्या या नाटकाने रंगभूमीवर नवचैतन्य निर्माण केलं आहे.
प्रतिकात्मक अंत्ययात्रा अन् श्वानाच्या गळ्यात फोटो; गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात निषेध आंदोलन
या सोहळ्यात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेत्री अंजली वालसणकर यांनाही समान पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराचे वितरण ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही! शिवाजी वाटेगावकरांचा गोपीचंद पडळकरांना सज्जड दम