तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही! शिवाजी वाटेगावकरांचा गोपीचंद पडळकरांना सज्जड दम

पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्यामुळे शिवाजी वाटेगावकरांनी गोपीचंद पडळकरांना सज्जड दम भरला.

_Shivaji Vategaonkar Warning Gopichand Padalkar

Shivaji Vategaonkar Warning Gopichand Padalkar On Jayant Patil : सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठं वादळ उठलं आहे. पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात अत्यंत खालच्या भाषेत टीका केली, तसेच राजारामबापू पाटलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात प्रचंड निषेध व्यक्त झाला असून, विरोधकांकडून पडळकरांवर हल्लाबोल सुरू आहे.

पडळकरांवर हल्ला

या प्रकरणानंतर (Jayant Patil) बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी थेट पडखळकरांना (Gopichand Padalkar) सज्जड दम दिला आहे. “तुला समाजात काही काडीचीही किंमत नाही, जयंत पाटलांविरोधात बोलायला तू कोण? तुला कपडे काढूनच पाठवतो. जत तालुक्यातून (Sangli) निवडून येऊन दाखवच, अशा कठोर शब्दांत वाटेगावकरांनी (Shivaji Vategaonkar)पडळकरांवर हल्ला चढवला.

शिवाजी वाटेगावकर म्हणाले की, धनगर समाजाला मान खाली घालायला लावणारे वक्तव्य पडळकरांनी केलं. बापूसारख्या थोर व्यक्तीवर बोलायला तो एवढा मोठा झाला का? समाजात त्याला कोणतीही किंमत नाही. पडळकरांनी जर असल्या प्रकारे बोलणं चालू ठेवलं, तर आम्ही गप्प बसणार नाही.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

दरम्यान, पडळकरांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून नाराजी व्यक्त केली असल्याचं समोर आलं. फडणवीसांनी यानंतर पडळकरांना फोन केल्याचंही वृत्त आहे.

पडळकरांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र पडळकरांनी अद्यापही आपलं मत बदललेलं नाही आणि ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत.

follow us