पाकडे सुधारणार नाहीच! अर्धशतकानंतर फरहानची गोळीबार स्टाईल, नेटकऱ्यांचा संताप…
आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकचा फलंदाज सोहबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर गोळीबार स्टाईलने सेलिब्रेशन केलंय.

Ausia Cup 2025 : आशिय चषकातील सुपर 4 सामन्यात काल भारताने पाकिस्तानचा (India Pakistan) दारुण पराभव केला. भारताने 6 गडी राखून पाकिस्तानवर सलग दुसरा विजय मिळवलायं. भारताचे फलंदाज अभिषेक शर्माने 74 धावांचा पल्ला गाठला तर शुभमनने त्याला साथ दिली. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाच्या कृतीवरुन सध्या नेटकरी चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तानचा फलंदाज फरहानने अर्धशतकानंतर बॅट हातात धरुन गोळीबार स्टाईल केली. त्यामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडले
सोहबजादा फरहान याचे अर्ध शतक लागताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली,
पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता
बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे.
भारताचे… pic.twitter.com/AgByPlaWwu— Sanjay Raut (@rautsanjay61) September 21, 2025
काहि दिवसांपूर्वीच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशांत संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. 14 सप्टेंबर भारत पाक सामन्याला तीव्र विरोध करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. त्यामुळे नो हॅंडशेकमुळे वाद झाला. हा वाद नमलाच नाही तोवर आणखी एक वादझाला. पाकचा सलामीवीर साहिबझादा फरहानने स्टेडियममध्ये केलेल्या सेलिब्रेशनमुळे नेटकरी आक्रमक झालेत.
पहलगाममध्ये २७ निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या पाकसोबत क्रिकेट खेळण्यास भारतातील बहुतेक क्रिकेट प्रेमींचा विरोध असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय #BCCI ने घेतला, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हेच पाकने आज दाखवून दिलं. त्यांचा मस्तवाल खेळाडू साहिबजादा फरहान… pic.twitter.com/MXgZivVH7i
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2025
नेमकं काय केल फरहान साहिबझादाने?
साहिबझादा फरहान याने टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी सर्वाधिक 58 धावा केल्या. साहिबझादाने या दरम्यान 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. साहिबझादाने अर्धशतकाचं सेलीब्रेशन ज्या पद्धतीने केलं त्यानंतर सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे. साहिबझादाने अर्धशतकानंतर बॅट बंदूकीप्रमाणे हातात धरली आणि फायरिंग करण्याची एक्शन केली. साहिबझादाच्या या एक्शनने आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
प्रतिकात्मक अंत्ययात्रा अन् श्वानाच्या गळ्यात फोटो; गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात निषेध आंदोलन
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच पाकच्या खेळाडून केलेल्या कृतीमुळे भारतीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानचा हा क्रिकेटर नेमका क्रिकेटर की दहशतवादी असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन संताप व्यक्त केलायं.