India Vs Pakistan : ‘आझाद काश्मीर..,’ पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने वादग्रस्त विधान करताच भारतीय संतापले…

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार सना मीरने तिच्या समालोचनाच्या वेळी "आझाद काश्मीर" चा उल्लेख करून एक नवीन वाद निर्माण केलायं.

Untitle (9)

India Vs Pakistan : महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 दरम्यान, नवा वाद उफाळून आलायं. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधादर सना मीरने (Sana Mir) भाष्य करताना आझाद काश्मीरचा उल्लेख केल्याने नवीन वादाला तोंड फुटलंय.

पुढे निवडणुका नाही, असं त्यांना वाटतंय; पंकजाताईंच्या मेळाव्याला दांडी मारणाऱ्यांना धनंजय मुंडेंनी सुनावले !

श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामना खेळवला गेला. पाकिस्तानी संघ फलंदाजी करताना नतालिया परवेज मैदानात आली. त्याचवेळी सना मीरने म्हटलं, नतालिया आझाद काश्मीरमधून येते, तिला क्रिकेट खेळण्यासाठी तिला लाहोरला यावं लागतं, तिच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून भारतीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यक्रमाला गेले असते तरी आंबेडकरी विचार…, कमलाताईंनी RRS’च्या कार्यक्रमाबद्दल पुन्हा निर्णय बदलला

आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला, प्रशिक्षकाला किंवा सामन्याशी संबंधित अधिकाऱ्याला राजकीय वक्तव्य करण्यास सक्त मनाई आहे. काश्मीरला ‘आजाद कश्मीर’ म्हणून संबोधल्यामुळे सना मीरने या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तिला कॉमेंट्री पॅनेलमधून वगळले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात 3% वाढ, पेन्शनधारकांनाही लाभ

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर राजकारणाचा आरोप होत आहे. याआधी एशिया कप 2025 दरम्यानही भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये अनेक वाद निर्माण झाले होते. वर्ल्ड कपसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशा प्रकारचे वक्तव्य होणे हे आयसीसीसाठी गंभीर बाब मानली जात आहे.

धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी, सरपंचाने थेट गाडीच पेटवली

दरम्यान, सामना पाहत असताना पाकिस्तान महिला संघाला बांग्लादेशने 7 गडी राखत पराभूत केलं पण या पराभवाच्या चर्चेपेक्षा सना मीरच्या विधानानेच लक्ष वेधलंय. आशिया कप ट्रॉफीचा वाद अद्याप संपलेला नसताना पाकिस्तान सातत्याने नापाक कृत्य करत असल्याचे दिसून येत आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध पाहता, सना मीरने तिच्या समालोचनाच्या वेळी “आझाद काश्मीर” चा वापर केल्याने एक मोठा वाद निर्माण होऊ शकतो.

follow us