IND vs PAK Final : दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल; भारत-पाकिस्तान फायनलसाठी सर्व तिकिटे सोल्ड आउट

IND vs PAK Final : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज ऐतिहासिक अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल

  • Written By: Published:
IND Vs PAK Final

IND vs PAK Final : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज ऐतिहासिक अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 41 वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना होत आहे. त्यामुळे चाहते देखील या सामन्याची जोरदार तयारी करताना दिसत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज होणाऱ्या सामन्यासाठी सर्व तिकिटे सोल्ड आउट झाली आहे. दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल झाला आहे.

माहितीनुसार आज दुबई स्टेडियम (Dubai Stadium) होणारा भारत आणि पाकिस्तान सामना पाहाण्यासाठी जवळपास 28 हजार चाहते येण्याची शक्यता आहे. या स्टेडियमची क्षमता 25 हजार आहे मात्र या सामन्यासाठी 3 हजार आसनांची वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत दोनदा सामना झाला आहे. दोन्ही सामन्यात भारताने बाजी मारली होती. तर आता अंतिम सामन्यात देखील भारत पाकिस्तानाचा सलग तिसऱ्यांदा पराभव करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

एका वृत्तानुसार, आशिया कप 2025 च्या (Asia Cup 2025) अंतिम सामन्यासाठी सर्व तिकिटे विकली गेली आहेत मात्र आता देखील काही प्रीमियम हॉस्पिटॅलिटी सीट्स अजूनही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत मात्र त्यांची किंमत खूप जास्त आहे. स्काय बॉक्स लाउंजची किंमत US$2,267.03 (अंदाजे ₹2 लाख), बाउंड्री लाउंज पॅकेजची किंमत US$1,700.27 (अंदाजे ₹1.5 लाख) आणि ग्रँड लाउंजची किंमत US$991.83 (अंदाजे ₹88,000) आहे.

Maruti Suzuki Dzire खरेदीची उत्तम संधी; होणार तब्बल 88 हजारांची बचत; जाणून घ्या कसं

भारत-पाकिस्तान सामना पाहिला

तर दुसरीकडे जिओसुपर न्यूजने दिलेल्या एका वृत्तानुसार आशिया कप 2025 च्या सुपर फोरमध्ये झालेला भारत- पाकिस्तान सामना पाहण्यासाठी तब्बल 17  चाहत्यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. तर 14 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रुप सामना पाहण्यासाठी 20 हजार चाहत्यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. दोन्ही सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहज पराभव केला होता.

follow us