Maruti Suzuki Dzire खरेदीची उत्तम संधी; होणार तब्बल 88 हजारांची बचत; जाणून घ्या कसं
Maruti Suzuki Dzire : जीएसटीमध्ये कपात केल्यानंतर भारतीय बाजारात आता कार खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यातच जर तुम्ही देखील मारुती

Maruti Suzuki Dzire : जीएसटीमध्ये कपात केल्यानंतर भारतीय बाजारात आता कार खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यातच जर तुम्ही देखील मारुती सुझुकी डिझायर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आंनदाची बातमी आहे. जीएसटी कपात आणि डिस्काउंटनंतर भारतीय बाजारात या कारची किंमत खूपच कमी झाली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जीएसटी कपातनंतर या कारची किंमत 88,000 पर्यंत कमी करण्यात आली आहे. तर फेस्टिवल डिस्काउंट 63,400 पर्यंत आहे. मात्र शहर आणि डीलरशिपनुसार या डिस्काउंट बदलू शकतो.
Maruti Suzuki Dzire
जीएसटी कपातनंतर या कारच्या किंमतीमध्ये 88,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मारुती सुझुकी डिझायरची एकूण किंमत कपात व्हेरिएंटनुसार 58,000 ते 88,000 पर्यंत आहे. डिझायर मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. डिझायरच्या एएमटी व्हेरिएंटमध्ये 72,000 ते 88,000पर्यंत जीएसटी कपात करण्यात आली आहे.
Maruti Suzuki Dzire इंजिन
न्यू जनरेशन मारुती सुझुकी डिझायरमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक फीचर्स देण्यात आले आहे. या कारच्या रियरमध्ये चार-सिलेंडर पेट्रोल मोटरची जागा घेणारे पूर्णपणे नवीन झेड-सिरीज 1.20 -लिटर एस्पिरेटेड थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. या कारला ग्लोबल एनसीएपी (जीएनसीएपी) आणि इंडिया एनसीएपी (बीएनसीएपी) या दोन्हींकडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
राज्यात आजही धो धो पाऊस; मुंबई, अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maruti Suzuki Dzire सेफ्टी रेटिंग
तर दुसरीकडे या कारला 5-स्टार जीएनसीएपी आणि बीएनसीएपी सेफ्टी रेटिंग आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त, नवीन डिझायरमध्ये फॅक्टरी-इंस्टॉल केलेले सीएनजी किट देखील उपलब्ध आहे. त्यामुळे आता जीएसटीमध्ये कपात आणि फेस्टिवल डिस्काउंटनंतर या कारच्या विक्रीमध्ये मोठी वाढ होणार असल्याची चर्चा सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.