मोक्काचे आरोपी भाजपला चालतात? रविंद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्रीयत्व जागं असलेले सर्वजण…

BJP State President Ravindra Chavhan on Hinduttv and Accused of Mcoca : भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan ) यांनी नुकतीच ‘लेट्सअप सभा’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची योजना, ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व आणि भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद हा त्यांचा प्रवास कसा होता? याबद्दल सांगितलं आहे. यावेळी बोलताना मोक्का लागलेल्या आरोपींमध्ये भारतीय जनता पक्ष कोणते राष्ट्रीयत्व आणि हिंदूत्व पाहते? यावर त्यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
यावेळी बोलताना चव्हाण (Ravindra Chavhan ) म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीयत्वाविषयी विचारले असता रविंद्र चव्हाण म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष आधी राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः या भूमिकेतून काम करतो. परमवैभवाच्या दिशेने राष्ट्राला घेऊन जाण्याची भुमिका भारतीय जनता पक्षाची राहिली आहे. त्यामुळे राष्ट्राला आवश्यक असणारे निर्णय जसं की, काश्मीरमध्ये जेव्हा कलम 370 लागू होतं तेव्हा काश्मीरचा ध्वज वेगळा होता, घटना वेगळी होती, तेव्हा पक्षाच्या संस्थापकांनी आणि इतर नेत्यांनी पक्ष स्थापनेच्या काळात, ‘एक देश एक निशाण’ अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका साध्य करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली”.
ऑपरेशन सिंदूर ते अंतराळात फडकला तिरंगा; अधिवेशनाच्या सुरूवात काय म्हणाले पीएम मोदी?
मोक्का असणारे आरोपींमध्ये कोणते राष्ट्रीयत्व?
रविंद्र चव्हाणांना (Ravindra Chavhan ) मोक्का असणाऱ्या आरोपींमध्ये पक्ष कोणतं राष्ट्रीयत्व पाहतो असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की, “एवढ्या मोठ्या देशात वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन जो व्यक्ती ‘भारत माता की जय’ असा जयघोष करतो, की ज्याला देशाभिमान आहे, देशासाठी सर्वस्व पणाला लावण्याची ताकद ज्याच्यात आहे. त्याला राष्ट्रीयत्व म्हणायचं. पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं तेव्हा सर्वच विचारसरणीच्या लोकांमध्ये राष्ट्रीयत्व जागं झालं. भारतीय पक्षाची हीच भूमिका राहिली आहे. जो कोणी व्यक्ती या भूमिकेशी संलग्न असेल आणि ज्याच्यामध्ये राष्ट्रीयत्व आहे अशा सर्व व्यक्ती पक्षात सामील होऊ शकतात”.
Ravindra Chavan Exclusive : हिंदीसक्तीवरून भाजपची कोंडी ते फडणवीसांची स्पेशल स्क्रिप्ट
गोपीचंद पडळकरांवर कारवाई का नाही?
गोपीचंद पडळकर विरोधकांवर टीका करताना पातळी सोडून टीका करतात तरीही त्यांच्यावर कारवाई होताना का दिसत नाही? या प्रश्नावर ते म्हणाले की, “गोपीचंद पडळकरांसोबत विधानभवनात झालेल्या घटनेबद्दल बोलणं झालं आहे. जी घटना घडली ती काही योग्य नव्हती. हेच देवेंद्रजींनीही सांगितलं आहे. त्यासंदर्भात पडळकरांनी सभागृहात दिलगिरीही व्यक्त केली आहे. प्रत्येकाने कशा पद्धतीने बोलावं याबद्दल खरं तर आचारसंहिता असायला हवी? असं आमचं ठाम मत आहे. याबाबतीत मी आणि देवेंद्रजींनी ज्यांना ज्यांना जे काही सांगितलं पाहिजे ते ते सांगत आहोत.