ऑपरेशन सिंदूर ते अंतराळात फडकला तिरंगा; अधिवेशनाच्या सुरूवात काय म्हणाले पीएम मोदी?

ऑपरेशन सिंदूर ते अंतराळात फडकला तिरंगा; अधिवेशनाच्या सुरूवात काय म्हणाले पीएम मोदी?

PM Modi Speech before Monsson Session of Parleament on Opration Sindoor and ISS Shubhanshu Shukla : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर आज 21 जुलै 2025 पासून दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्याअगोदर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी फडकावलेल्या तिरंग्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

Ravindra Chavan Exclusive : हिंदीसक्तीवरून भाजपची कोंडी ते फडणवीसांची स्पेशल स्क्रिप्ट

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, पावसाळा नाविन्य आणि सर्जनशीलतेच प्रतिक आहे. हा काळ देशाला नवी उर्जा, प्रेरणा आणि नव्या धोरणांना जन्म देणारा आहे. सध्या देशात अनुकूल पाऊस होत आहे. जो कृषी आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. पाऊस हा शेतकरी, गावं, आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या 10 वर्षांतील तिप्पट जास्त पाणीसाठी या पावसाळ्यात निर्माण झाला आहे. ज्याचा येणाऱअया काळात अर्थव्यवस्थेला जास्त फायदा होणार आहे.

ब्रेकिंग! मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका ; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

त्याचबरोबर यावेळी मोदी यांनी सैन्याचं ऑपरेशन सिंदूर आणि आंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अतंराळात फडकावलेल्या तिरंग्याबद्दल बोलताना म्हटलं की, भारताचा पहिला तिरंगा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर फडकला हा क्षण ऐतिहासिक होता. प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रवासातील भारताचं यश दर्शवतं.

फडणवीसांचं अभिनंदन नाही, पण विरोध करायला… मराठीच्या मुद्द्यावरून रविंद्र चव्हाणांचा ठाकरे बंधुंना टोला

पीएम मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ चा उल्लेख करत म्हटलं की, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या घरात घुसून 22 मिनटांमध्ये त्यांची घरं जमीनदोस्त केली. कर दिया. त्यात आपण 100 टक्के ध्येय प्राप्त केलं. सैन्याने जगाला दाखवून दिलं की, मेड इन इंडियाची ताकद काय आहे? https://youtu.be/b8tl9Dau5Ew?si=vyt5puVnin5XXZbU

follow us
  • fb
  • instagram
  • youtube