फडणवीसांचं अभिनंदन नाही, पण विरोध करायला… मराठीच्या मुद्द्यावरून रविंद्र चव्हाणांचा ठाकरे बंधुंना टोला

फडणवीसांचं अभिनंदन नाही, पण विरोध करायला… मराठीच्या मुद्द्यावरून रविंद्र चव्हाणांचा ठाकरे बंधुंना टोला

BJP State Precident Ravindra Chavhan Criticize Raj and Udhhav Thackeray Marathi Hindi Language Dispute : भाजपकडून नुकतच रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ सुरू होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. तसेच राज्यातील विविध विषयांच्या पार्श्वभुमीवर लेट्सअप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यावेळी हिंदी सक्तीच्या विरोधावरून राज आणि उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लागावला आहे.

काय म्हणाले रविंद्र चव्हाण?

याेवेळी बोलताना रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) म्हणलाे की, गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी सक्तीची चर्चा होत होती. मग त्यावर त्यावेळीच का चर्चा नाही केली? हिंदी सक्ती करूच नये असं का म्हटले नाही? मात्र यावर अभ्यासकांनी अभ्यास करून त्यांचं मत मांडलं की, हिंदी सक्ती का गरजेची आहे? त्यांनतर प्रत्येक राज्याला त्यांचं मत विचारलं गेलं. त्यावेळी महाराष्ट्राला देखील विचारलं गेलं.

राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा? वडेट्टीवारांचा थेट सवाल, शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्यावर…

तसेच देवेंद्र फडणवीसांचं सरकार नेहमीच मराठी भाषेला प्राधान्य देत आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस मु्ख्यमंत्री आणि विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना त्यांनीच राज्यामध्ये सर्व प्रकारचे अभ्यासक्रम हे मराठी या मातृभाषेमध्ये हवे. असा आग्रह धरला आणि त्याची सुरूवात देखील केली. कारण चीन वैगेरे इतर देशांमध्ये देखील लहान मुलांना सर्व प्रकारचं शिक्षण हे मातृभाषेतच दिलं जात. तसेच शास्त्रज्ञ देखील तेच सांगतात की, मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे जास्त फायदेशीर ठरतं.

छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण, लातूर बंद; सूरज चव्हाण यांचा माफीनामा

मात्र आता निवडणुकांच्या तोंडांवर राज आणि उद्धव ठाकरेंनी हिंदीच्या मुद्द्याला केलेला विरोध हा केवळ राजकीय आहे. तसेच मराठीतून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाची सुरूवात करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंनी कधी अभिनंदन का नाही केलं? तसेच नुकतच तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा जीआर लोकांचा आग्रह आहे म्हणून रद्द करण्यात आला. मात्र त्यावर पुन्हा अभ्यासगट नियुक्त केला आहे. जर त्यांनी पुन्हा तसाच अहवाल दिला तर ठाकरे काय म्हणणार?

आगामी निवडणुकांचं प्लॅनिंग अन् CM फडणवीसांची स्क्रिप्ट…भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी केला मोठा खुलासा

तसेच राज्यात त्रिभाषा सूत्र लागणार कारण केंद्राने तसे म्हटलं. ठाकरेंचं सरकार असताना त्यांनी देखील ते स्विकारलं. मात्र ही त्रिभाषा सूत्राची सक्ती नाहीच आहे. तो लोकांवर अवलंबून आहे. असं म्हणत रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube