आगामी निवडणुकांचं प्लॅनिंग अन् CM फडणवीसांची स्क्रिप्ट…भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी केला मोठा खुलासा

BJP New State President Ravindra Chavan Interview : भाजपचे (BJP) नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात (Ravindra Chavan Interview) मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (BMC Election) प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.
रवींद्र चव्हाण यांची भूमिका काय?
भाजपमध्ये काम करणाऱ्याला संधी मिळते, त्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे. पक्षात 2002 पासून जी जबाबदारी मला दिली, ती मी पूर्ण केली. पक्षाने त्यामुळे मला नेहमीच संधी दिली आहे, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. पार्टी खूप मोठी आहे, विस्तार खूप मोठा आहे. मंत्रिपद मिळालं नाही यावर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं की, त्यामुळे मी मंत्रालयातच होतो. तेव्हा मला देवेंद्रजींचा फोन आला. त्यांनी सांगितलं की तुला पार्टीचं काम करावं लागेल. मला खूप सन्मान भाजपाने दिला. माझी ओळखच भारतीय जनता पार्टी आहे.
पक्षाचा विस्तार करण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांना घेवून पक्षाला मजबूत करायचं आहे. केंद्रात, राज्यात अशा अनेक संधी असतात, त्या संधी ज्या आपल्याला आपोआप मिळतात. त्यात आपण कुठे बसतो, हा विचार करणं गरजेचं असतं. जे प्रारब्धात आहे, ते नक्की मिळणार.
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीच
महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीच होणार. येणाऱ्या काळात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच व्हावी, याचा पूर्ण प्रयत्न अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी करणार आहेत. आम्ही सर्व कार्यकर्ते ते ज्या पद्धतीने दिशा देणार, तसे काम करणार. तिघांमध्ये चांगल्या प्रकारचं बॉडिंग आहे. अनुभव आहे, ते सांगतील त्या दिशेने काम करणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर, नगराध्यक्ष होणार असं देखील त्यांनी म्हटलंय.
Video : इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये तरुणाने खाल्लं चिकन; व्हिडिओ व्हायरल, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिकेबद्दल विचार करतो. राज ठाकरेंच्या स्क्रिप्टच्या आरोपावर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय की, मी देवेंद्रजींना जावून विचारेन. हिंदीचा अट्टाहास का, तर यावर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय की, याचा अभ्यास करावा लागेल. त्रिभाषेचा दहा ते बारा वर्ष अभ्यास केला गेला. शास्त्रज्ञांनी मतं मांडलं, त्यानंतर हे मतं मांडलं गेलं, असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.