Ravindra Dhangekar : अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश; आमदार धंगेकरांना ऑफर?

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश; आमदार धंगेकरांना ऑफर?

Ravindra Dhangekar on Ashok Chavan : मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) असे तीन धक्के काँग्रेसला एका महिन्यात बसले आहेत. चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत? काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून काय ऑफर येत आहेत? यासंदर्भात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना मोठे खुलासा केला. माझा विजय झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरा झाली होती. राज्यात कुठंही गेली तरी लोक भेटायला येतात. आज मी काँग्रेसमध्ये हिरो आहे. भाजपमध्ये जाऊन कशाला झिरो होऊ. एक नंबरच्या लाईनमध्ये बसणारे अशोक चव्हाण दुसऱ्या तिसऱ्या लाईनमध्ये जाऊन बसतील. भाजपमध्ये लोक झिरो व्हायला जातात, अशी टीका धंगेकरांनी केली.

धंगेकर म्हणाले की आता ज्यांना जायचं आहे ते भीती पोटी जात आहेत. ज्यांना भीती नाही ते काँग्रेसमध्ये आहेत. मागील वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपमध्ये गेल्यापासून मला सुखाने झोप येते. आता ज्यांना सुखाने झोप घ्यायची आहे हे भाजपमध्ये गेले आहेत. म्हणजे त्यांच्या मागील चौकशा बंद होतील. काही दिवसांनी आदर्श घोटाळा झालाच नव्हता असे म्हणतील.

चव्हाणांची एन्ट्री होताच भाजपनं राणेंसाठी सेट केला अवघड पेपर; यशस्वी होण्यासाठी लागणार कस

ते म्हणाले की आतापर्यंत काँग्रेस 100 फुटली पण पक्ष तिथंच आहे. लोकशाहीत मतदार प्रमुख मानला जातो. नेता गेला म्हणून पक्ष जात नाही. मतदारांना जी किंमत असते तेवढी किंमत नेत्यांना नसते. मतदार काँग्रेससोबत आहेत. कोणी कुठं गेलं म्हणून काही फरक पडत नाही.

वडिलांना अन् तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलं..,; बाळासाहेब थोरातांचा घणाघात…

आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडली. याचा अर्थ भाजप कमकुवत आहे. त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता नसलेली लोक आहेत. त्यामुळे ह्यांना बाहेरची लोक घ्यावी लागतात. आता जे लोक घेतले आहेत त्यांच्यावर यापूर्वी भाजपच्या लोकांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्यामागे केंद्रिय यंत्रणांच्या चौकशा लावल्या होत्या. विरोधी पक्षातील नेत्यांवर दडपशाही करून भाजपमध्ये नेलं जात आहे, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे.

काँग्रेसचा आदर्श आता भाजपमध्ये जमा झाला आहे. आता त्या आदर्शाचा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या लोकामध्ये क्षमता नाही. 100 आमदार वळचणीला पडले आहेत पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची नेहून त्यांना मंत्रीपद दिली जात आहेत. ह्यांना मंत्रिपद दिली जात आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, अशीही टीका धंगेकरांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज