चव्हाणांची एन्ट्री होताच भाजपनं राणेंसाठी सेट केला अवघड पेपर; यशस्वी होण्यासाठी लागणार कस

चव्हाणांची एन्ट्री होताच भाजपनं राणेंसाठी सेट केला अवघड पेपर; यशस्वी होण्यासाठी लागणार कस

काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या विधासनभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं. ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्याने राज्यसभा निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत. राज्यसभेतून निवृत्त झालेले खासदार नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपला अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर खासदार करायचं आहे. त्यामुळे आता भाजप कोणताही धोका पत्करत नाही. सध्या भाजपमध्ये राज्यसभेच्या उर्वरित दोन जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. नारायण राणे आणि पियुष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवणार आहे.

योगी, अमित शाह की… आणखी कोण? कोण ठरू शकतो पीएम मोदींचा खरा उत्तराधिकारी?

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर भाजपमधून राज्यसभेसाठी अंतर्गत हालचाली सुरु झाल्या आहेत. आधीच्या राज्यसभा खासदारांना उमेदवार दिली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशातच आता ज्यांना राज्यसभेसाठी आधी उमेदवारी देण्यात आली त्यांना नाकारण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये नारायण राणे, पियुष गोयल आणि भागवत कराड यांची नावे आहेत. नारायण राणे यांचा कोकणात चांगला दबदबा आहे. सध्या रत्नागिरी-सिंदुधुर्ग मतदारसंघात विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. ते ठाकरे गटाचे खासदार असून मागील दोन निवडणुकीपासून ते खासदार आहेत. आता राऊत यांना शह देण्यासाठी भाजपकडून राणेंना रत्नागिरी लोकसभेसाठी मैदानात उतरवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यातील हुकूमी एक्का, मोदी लाटेतही ‘विजयी’; चव्हाणांच्या ‘पॉलिटिक्स’ची BJP लाही गरज

भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेलेले दुसरे खासदार पियुष गोयल हे आहेत. पियुष गोयल यांचा मुंबईत दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे आता यंदाच्या लोकसभेत गोयल यांना भाजप मुंबईतील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत सांगतील. तर तिसरं नाव म्हणजे भागवत कराड यांनाही लोकसभेसाठीच भाजपकडून सूचना देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना

मागील अनेक वर्षांपासून भाजपात काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांना अद्याप भाजपकडून कोणतीही पदं मिळालेली नाहीत. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं नाव चर्चेत आहे. राज्यसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासह हर्षवर्धन पाटील यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येऊ शकते. कारण त्यांना अनेक वर्षांपासून भाजपचे कोणतंही पद वा जबाबदारी मिळालेली नाही. त्यामुळे पाटील यांचं भाजप राज्यसभेवर पाठवून पुनर्वसन करु शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या महायुतीचं पक्षीय बल हे सहा राज्यसभेच्या जागांपैकी तीन जागा भाजपकडे आहेत. तर प्रत्येकी एक जागा शिंदे आणि अजित पवार गटाकडे आहे. तर एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. मात्र, आता अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांकडून क्रॉस व्होट घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप चौथ्या जागेवरही उमेदवार उतरु शकते, अशी शक्यता आहे..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज