जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना

जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना

Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहता कामा नये. तसेच टंचाई नियोजनासंदर्भातील सर्व्हेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा टंचाई निवारण नियोजनासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन बैठक दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil), जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे(Ram Shinde), आ.मोनिका राजळे, आमदार लहू कानडे, आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure), अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Collector Siddharam Salimath)आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चव्हाणांनी पक्ष सोडणं हे दुर्भाग्यपूर्णच; राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया…

पालकमंत्र्यांनी येणाऱ्या टंचाई काळात जिल्ह्यातील पाणीसाठा, जनावरांचा चारा, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा सविस्तर आढावा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि तक्रारी ऐकून घेत त्यांचे निसरन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा इतर अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने टंचाई निवारण आराखडा करण्यासाठी सांगितले.

राजकुमार रावच्या ‘बधाई दो’ची अफलातून दोन वर्ष; वेगळ्या अंदाजात केला जल्लोष

पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, टंचाई काळात पाण्याचे नियोजन नीट करण्यात यावे, तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, शहर तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना आखाव्यात. ज्या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्या ठिकाणी तातडीने टॅंकरने पाणी पुरवठा वाढवावा, तसेच ग्रामीण भागात जिथे टॅंकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही, त्या ठिकाणी बैलगाड्यांच्या सहाय्याने पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी. प्रभावीत गावांमध्ये पाण्यासाठी पाणी संचय टाक्या उभारण्यात याव्यात. नवीन पाणी पुरवठा योजना राबविताना कार्यरत असलेला पुरवठा प्रभावित होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही यावेळी सांगितले.

जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहू नये, त्यासाठी शहरी तथा ग्रामीण भागातील पाणीसाठ्याची पाहणी करुन त्याचे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. टंचाई निवारण संदर्भात आवश्यक असेलल्या सर्व शासकीय परवानग्या, निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून टंचाई निवारण आराखडा पूर्ण करावा, त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे मागणी करावी. या सर्व प्रक्रिया तातडीने पार पाडून नागिराकांना दिलासा द्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

या बैठकीत जिल्ह्यात जनावरांसाठी चारा आणि पाणी कमी पडणार नाही, याची सुद्धा काळजी प्रशासनाने घ्यावी. त्याचबरोबर सततचा पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा सुद्धा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत उपस्थित असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भोसपुरी 16 गावांच्या पाणी पुरवठा योजना, पाथर्डी, शेवगाव येथील पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करुन तातडीने या गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना बैठकीत केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज