चव्हाणांनी पक्ष सोडणं हे दुर्भाग्यपूर्णच; राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया…
Balasaheb Thorat News : अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून जाणं हे दुर्भाग्यपूर्णच असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
अशोक चव्हाण पाडणार काँग्रेसला मोठं खिंडार; साथ देणाऱ्या दिग्गज नेत्यांचा राजीनामा तयार
बाळासाहेब थोरात म्हणाले, अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून जाणं दुर्भाग्यपूर्ण आहे. काँग्रेसमध्ये काम करताना अशोक चव्हाण यांना अनेक संधी मिळाल्या होत्या. देशपातळीवर जाण्याचीही त्यांना संधी होती. मात्र, त्यांनी काँग्रेस सोडली आहे.,त्याची खंत आम्हाला असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
आंबेडकरांना महाविकास आघाडीत जमेना! आता थेट भुजबळांना खुणावले
तसेच येणारी राज्यसभा निवडणूक आम्ही काळजीपूर्वक लढवणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीतही आमची आघाडी भाजपबरोबर चांगली लढाई लढणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. आमदार मतदारसंघात फिरत असतात, त्यामुळे सर्वांचा संपर्क झाला नाही. मात्र, काही जणांशी संपर्क झाला आहे, अद्याप कोणताही आमदार अशोक चव्हाणांसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट असल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे.
Video : सरडाच विसरला आपला रंग… शरद पवारांच्या पक्षाकडून थेट अजितदादांची सरड्याशी तुलना
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार असून गरज पडेल तेव्हा आणि योग्य वेळ असेल तेव्हा व्हीप जारी करणार आहोत. यासंदर्भात येत्या 14 आणि 15 तारखेला बैठक होणार आहे. भाजपचं ऑपरेशन लोटस सर्वच ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्येही तेच सुरु आहे. काँग्रेसमुक्त भारत कधी होऊच शकत नाही, कॉंग्रेस शाश्वत विचारधारा असल्याचं बाळासाहेब थोरातांनी ठणकावून सांगितलं आहे.