Sanjay Gaikwad On BMC Election : … तर मुंबईत महापौर आमचाच होईल, भाजपला इशारा देत शिंदेंच्या नेत्याचा मोठा दावा

Sanjay Gaikwad On BMC Election : राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष महानगरपालिका

  • Written By: Published:
Sanjay Gaikwad On BMC Election

Sanjay Gaikwad On BMC Election : राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष महानगर पालिका निवडणुकांकडे लागले आहे. राज्य निवडणूक आयोग पुढील काही दिवसात राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर करणार आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला इशारा देत मोठा दावा केला आहे. जर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती झाली नाही तर मुंबईत आमचाच महापौर असेल असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. संजय गायकवाड म्हणाले की, मुंबईमध्ये जर जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे महाराष्ट्रात इतर महापालिका आणि नगरपालिकांमध्ये झाले की काही ठिकाणी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) आपापसात लढली आणि त्याचा फटका आम्हालाच बसला आणि महाविकास आघाडीला (MVA) फायदा झाला. अद्याप शिवसेनेचा महापौर होईल असे वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आले नाही पण जर महायुती झाली तर आम्ही पण आमचा महापौर करु असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.

तसेच महायुती टिकवण्यासाठी आणि मुंबई जिंकण्यासाठी एकत्र लढणे गरजेचे असल्याचे मत देखील आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले मात्र युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेसाठी जागावाटपाबाबतच्या चर्चा लवकरच सुरु करु असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मुंबई महानगर पालिकेसाठी कोण किती जागांवर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पद्मश्री अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते “मॅजिक” चित्रपटाचा टीजर लाँच-

ठाकरे बंधू एकत्र येणार

मुंबई महानगर पालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होणार आहे. शिवसेना ठाकरे गट मनसेला 70 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच ठिकाणी मनसे उमेदवार देणार असं देखील सांगितलं जात आहे.

follow us