समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अडकले विवाहबंधनात
दत्त जयंतीच्या मुहूर्तावर समाधान सरवणकर, तेजस्विनी लोणारी अडकले विवाहबंधनात. चाहत्यांकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव.
Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding : मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि राजकीय घराण्यांचे नाते हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. अशाच एका नव्या नात्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून मराठी मनोरंजन (Entertainment) विश्वात रंगत आहेत.

मागील बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी लोणारी (Tejswini Lonari) आणि शिवसेना (Shivsena) पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) हे विवाहबंधनात अडकणार असलायची चर्चा होती. नुकताच त्यांचा साखपुडा देखील पार पडला होता.

आज दत्त जयंती आणि पौर्णिमेच्या मुहूर्तावर समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. समाधान सरवणकर हे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे चिरंजीव आहेत. दत्त जयंती आणि पौर्णिमेच्या मुहूर्तावर त्यांच्या आयुष्यातील हा खास क्षण त्यांनी साजरा केला.
या सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून चाहत्यांकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने ‘नो प्रॉब्लेम’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

यानंतर ‘चित्तोड की राणी पद्मिनी का जोहर’ या मालिकेत पद्मिनीची भूमिका साकारत तिने हिंदी टेलिव्हिजनवर देखील आपला ठसा उमटवलाय. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉस 4 या कार्यक्रमातून. चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्रात या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.
