उद्धव ठाकरे शोलेमधले ‘जेलर’ तर देवेंद्र फडणवीस नायक चित्रपटातले अनिल कपूर, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

Amruta Fadnavis : उद्धव ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ शकतात अशी शंका मला 2019 च्या विधानसभा

  • Written By: Published:
Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : उद्धव ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ शकतात अशी शंका मला 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आली होती असं एका मुलाखतीमध्ये बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी अनेक मोठे खुलासे देखील केले आहे. तर या मुलाखतीमध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांना आपल्या खास शौलीत उपमा देखील दिल्या आहे.

शिवसेना जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससह गेली तर काय?

या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, मी कधीही राजकीय सल्ला देवेंद्र फडणवीस यांना देत नाही पण कधी कधी माझे काही टोले असतात ते खरेही होतात. 2019 मध्ये निवडणुकीनंतर काही समीकरणं घडली होती, भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला एवढ्या जागा मिळाल्या की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससह गेले तर त्यांची सत्ता येईल. मी निवडणुकीच्या आधीच देवेंद्र फडणवीसांना विचारायची की तुमच्या दोन पक्षांची नाही पण तीन पक्षांची चांगली संख्या आली आणि शिवसेना जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससह गेली तर काय? मी देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला होता. कारण माझ्या मनात तशा शंका आल्या होत्या. पण देवेंद्रजींनी मला ठामपणे सांगितलं होतं की असं काही होणार नाही. उद्धवजी माझ्याही जवळचे आहेत त्यामुळे मला वाटत नाही की असा धोका आपल्याशी होईल. पण मी माझी शंका बोलून दाखवली होती असं या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शोलेतल्या जेलरसारखे तर राज ठाकरे काहीसे नाना पाटेकरांसारखे वाटतात असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या. या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये काही नेत्यांबाबत अमृता फडणवीस यांना कोणता सिनेमा, डायलॉग, पात्र किंवा गाणं आठवतं असं विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या.(Amruta Fadnavis)

उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरे हे शोलेमधले जेलरसारखे वाटतात. अंग्रेजो के जमानेंका जेलर हूँ मैं…, आधे इथर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ…

राज ठाकरे : राज ठाकरे खूप आक्रमक आहेत. ते नाना पाटेकर ब्रांड वाटतात.

एकनाथ शिंदे : एकनाथ शिंदेंचा चित्रपट आला होता धर्मवीर. धर्मवीरमधले एकनाथ शिंदेच एकनाथ शिंदे आहेत.

शरद पवार : मला शरद पवारजींबाबत एक गाणं आठवतं, अरे दिवानो मुझे पहचानो,कहाँ से आया मैं हूँ कौन? मै हूँ डॉन, मैं हूँ डॉन…

अजित पवार : अजितदादांबाबत इतकंच म्हणेन, दुनिया हसीनो का मेला, मेले मे ये दिल अकेला.

सुप्रिया सुळे : सुप्रिया सुळे चांगल्या स्क्रिप्ट रायटर होऊ शकतात. त्यांनीच म्हटलं होतं एकदा एक अकेला देवेंद्र क्या कर सकता है? त्यांचा डायलॉग व्हायरलही झाला होता.

छत्तीसगडमधील विजापूर-दंतेवाडा सीमेवर मोठी कारवाई, चकमकीत 12 माओवादी ठार

देवेंद्र फडणवीस : मला देवेंद्र फडणवीस नायक चित्रपटातले अनिल कपूर सारखे वाटतात. कारण अनिल कपूर दबावाखाली काम करत नाहीत. त्यांच्यात प्रचंड उर्जा आहे. त्या उर्जेने ते काम करतात असं या रॅपिड फायर राऊंडमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या.

follow us