Video : निलंबित पोलीस रणजित कासलेंचा नवा व्हिडीओ; अमृता फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Video : निलंबित पोलीस रणजित कासलेंचा नवा व्हिडीओ; अमृता फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Suspended police officer Ranjit Kasle : निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं आहे. (Kasle) या व्हिडीओत रणजित कासले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता या आरोपांवर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

या व्हिडीओत रणजित कासले यांनी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ॲक्सिस बँकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या तिथे चेअरमन की सीईओ म्हणून काम करतात. प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला धमकवलं जातं की त्यांचं अकाऊंट त्याच बँकेत हवं. प्रत्येक अकाऊंटमागे त्यांना ३०० रुपये मिळतात असंही यामध्ये म्हटलं आहे.

बँकेच्या नॉमिनी नियमांमध्ये झाले मोठे बदल; पैशाच्या वारशाशी संबंधित वाद कमी होण्यास मदत होणार?

जर २ लाख पोलीस आणि इतर पोलीस पकडून ३ ते ४ लाख सहज होतात आणि ३०० रुपयाप्रमाणे त्यांना किती मिळत असतील, याचा विचार करा. साधारण १० कोटी त्यांना मिळतात. याबद्दल पुराव्याची गरज नाही. हे संपूर्ण जनतेला समजू शकते. मला याबद्दल खुलासा करायचा होता, असा गंभीर आरोप रणजित कासलेंनी केला आहे. ॲड. प्रज्ञा पवार या नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.

प्रज्ञा पवार काय म्हणाल्या?

ॲड प्रज्ञा पवार यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत अमृता फडणवी यांना टॅग करत काही प्रश्न केले आहेत. देवेंद्र फडणवीस –अमृता फडणवीस –ऍक्सीस बंक –देवेंद्रचा भ्रष्टाचार? अत्यंत गंभीर आरोप! देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यावर गप्प का बसलेत? खुलासा करा. ॲक्सिस बँक, ॲक्सिस बँक सपोर्ट या गंभीर आरोपाचे स्पष्टीकरण तुम्ही देणार का? असा सवाल ॲड प्रज्ञा पवार यांनी केला आहे.

अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर काय?

यानंतर आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी प्रज्ञा पवार यांच्यावर टीका केली आहे. ॲड प्रज्ञा पवार तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहात? तुम्ही माझ्यावर पोलीसांच्या अकाऊंटसाठी ॲक्सिस बँकेकडून प्रत्येकी ३०० रुपये घेतल्याचा आरोप करत आहात? तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला का ओढत आहात? मुंबई पोलीस कृपया याची दखल घ्यावी? असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/PradnyaPawar121/status/1913395358459142590

follow us
  • fb
  • instagram
  • youtube