मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात, पुण्यात बसला होता लपून

Suspended police officer Ranjit Kasle in police custody : निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आहे. रणजित कासलेला पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट येथून ताब्यात घेतलं आहे. (Kasle )कासलेने मी शरण जाणार असल्याचा व्हिडिओ केला होता. मात्र, त्यापुर्वीच त्याला ताब्यात घेण्यात बीड बोलिसांना यश आलं आहे. बीड पोलिसांच पथक पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचा शोध सुरू केला होता.
कासले हा काल दिल्लीहून पुण्यात आला होता, तो स्वारगेटमधील एक हॉटेलमध्ये मुक्काम करत होता. आज पहाटे बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. रणजि कासले याने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे एन्काऊंट करण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा गंभीर आरोप त्याने केला होता.
बीड पुन्हा हादरलं! सरपंच अन् कार्यकर्त्यांकडून सत्र न्यायालयातील वकिल महिलेला जबर मारहाण
रणजित कासलेहा बीडचा निलंबित पोलीस अधिकारी आहे. काल कासले हा दिल्लीहून पुण्यात दाखल झाला होता. नंतर तो पुण्यातील स्वारगेट येथील हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आज पहाटे चारच्या सुमारास कारवाई करत बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं.
आपण पोलिसांना शरण येणार असा व्हिडीओ काल रणजित कासलेनं पोस्ट केला होता. मात्र शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी कारवाई करत पुण्यातून रणजित कासलेला ताब्यात घेतलं. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर कासले याने अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केले होते.
रणजित कासले यांनी काल पुण्यात आल्यावर पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले यांनी केला. त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवलं होतं.