मंगेशकर रुग्णालयबाबत ससूनचा आश्चर्यकारक अहवाल! डॉक्टर सुश्रुत घैसास दोषी नाहीच?

WhatsApp Image 2025 04 17 At 11.16.27 PM

Sassoon’s surprising report on Mangeshkar Hospital Is Dr. Sushrut Ghaisas not guilty : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Hospital) गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात मोठा संतपा निर्माण झाला. यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने चौकशीअंती एक अहवाल दिला आहे. ज्यामध्ये या सर्व प्रकरणात पैशांची मागणी करणाऱ्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे या रुग्णालयाला या प्रकरणांमध्ये तात्पुरता दिलासा मिळाला असल्याचा बोलले जात आहे. मात्र या डॉक्टरांवर कोणतेही आरोप करण्यात आले नसल्याने. हा त्यांना दिलासा आहे की, क्लीनचीट? अशी चर्चा सुरू झाली आहे.

साखर कारखान्यांची, बँकांची काय परिस्थिती, माहिती घ्या; जामखेडच्या कार्यक्रमातून अजितदादांनी नगरच्या नेत्यांना घेरले !

दरम्यान ससूनच्या वैद्यकीय समितीने पुणे पोलिसांना सहा पानांचा अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये दीनानाथ रुग्णालयातील उपचार प्रक्रिये बाबत स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष झाले नसल्याचे संकेत यामध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी यावर ससून रुग्णालयाचा पुन्हा एकदा अभिप्राय मागवला आहे.

>महंमद महाराज मंदिर जिर्णोध्दारप्रकरणी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी; नीलेश लंकेंची मागणी

त्याचबरोबर मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांवरही दुसऱ्या बाजूने काही आरोप करण्यात आले होते. दरम्यान, या सगळ्या आरोपांचं भिसे कुटुंबीयांनी खंडन केलं आहे. ज्या रेशन कार्डवरून ट्रोल करण्यात आलं तेच रेशन कार्ड भिसे कुटुंबीयांनी माध्यमांना दाखवलं.आमदाराच्या पीएला 30 हजार पेक्षाही कमी मानधन असतं. आमदाराचा पीए म्हणजे सगळे वाईट काम करणारा नसतो अनेक आमदाराचे पीए प्रामाणिक काम देखील करतात.

माझ्या अकाऊंटवर 10 लाख आले, रणजित कासलेंचा मुंडेंवर खळबळजनक आरोप

वार्षिक उत्पन्न 300000 पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या स्वीय सहायकांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला आहे. आमदाराचा स्वीय सहाय्यक असला तरीही इमानदारीने काम करणाऱ्या माणसाकडे एवढे पैसे नसतात. ज्या दिवशी दीनानाथ रुग्णालयात दहा लाख रुपये मागितले, त्यादिवशी आम्ही जागेवर तीन लाख रुपये द्यायला तयार होतो आणि सात लाख रुपयांची व्यवस्था आमदार अमित गोरखे हे करत होते, असंही भिसे कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube