माझ्या अकाऊंटवर 10 लाख आले, रणजित कासलेंचा मुंडेंवर खळबळजनक आरोप

Ranjit Kasle On Dhananjay Munde : माझ्या अकाऊंटला निवडणुकीच्या दिवशी 10 लाख रुपये जमा झाले होते, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चुकीच्या पद्धतीने निवडून आल्याचा खळबळजनक दावा वादग्रस्त निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी केलायं. कासले यांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधला.
मेधा कुलकर्णींविरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आक्रमक! दर्ग्यातील गोंधळासाठी अटकेची मागणी
पुढे बोलताना कासले म्हणाले, मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला पाच कोटी, दहा कोटी आणि पन्नास कोटींची ऑफर दिली असल्याचं रणजित कासलेंनी सांगितलंय. तसेच एन्काऊंटरच्या चर्चा बंद दाराआड झालेल्या आहेत. वाल्मिक कराडची संत बाळूमामा कंन्स्ट्रक्शन कंपनी, अंबेजोगाईला आहे. यामध्ये महादेव कराड आणि काळे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या अकाऊंटला दहा आले रुपये आले. त्यातील साडेसात लाख मी परत केले आहेत. अडीच लाखात माझा खर्च चालू आहे, माझ्या पगारातील सेव्हिंगमधून मी सध्या पैसे खर्च करीत असल्याचं रणजित कासले यांनी सांगितलंय.
साडे सात लाख मी रोख रक्कम आणि दुसऱ्याचे अकाऊंट अशा स्वरुपात दिलेले आहेत. माझ्या अकाऊंटला तेव्हा ४१६ रुपये होते. हे पैसे ईव्हीएम मशीनपासून दूर जाण्यासाठी होते. ईव्हीएमला जी काही छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. मतदानाच्या दिवशी माझी ईव्हीएमच्या इथे ड्युटी असताना मला का काढलं. तेव्हा परळीत अपुरं मनुष्यबळ होतं. माझी परळीला ड्युटी होती. ईव्हीएम मशीन जवळ रात्री माझी ड्युटी होती. याबद्दल माझे ऑर्डरही भेटले, असे रणजित कासलेंनी म्हटले.