उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येताच धनंजय मुंडे गेले मुंबईला; वाचा, काय आहे नक्की कारण?

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येताच धनंजय मुंडे गेले मुंबईला; वाचा, काय आहे नक्की कारण?

Ajit Pawar to visit Beed today : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुधवार (दि. २ एप्रिल)रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या दोऱ्यात आता मोठी अपडेट आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे (Beed ) उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आहे. प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे आपण उपस्थित राहणार नाहीत असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Video : पंकजांविरोधात मला सुपारी देण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं नवीन कांड बाहेर काढत दमानियांचे गौप्यस्फोट

बीड जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीसाठी आज अजित पवार दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजता एका सार्वजनिक कार्यक्रमातही अजित पवार आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. मात्र, राजीनाम्यानंतर नाराज असलेले धनंजय मुंडे प्रशासकीय बैठकीला हजर राहणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं असतानाच स्वतः धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा करत, आपल्या अनुपस्थिती बद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळं राजकीय वर्तुळातील अनेक चर्चांना उधान आलं आहे.

काय म्हणाले मुंडे?

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यामध्ये मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावं लागलं आहे. त्यामुळे बीड मधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती’ अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त

उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या या दौरादरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहराच्या विविध भागात अजित पवार बैठकांना उपस्थित राहणार असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे. याबरोबरच पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली असून, शहराच्या विविध भागात मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुलाबी रंगाची थीम कायमच ठेवली असल्याचे या बॅनर्स मधून दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube