दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

Dinanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Tanisha Bhise Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात काय आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, या प्रकरणात एकूणच रुग्णालय प्रशासनाची भूमिका वादग्रस्त राहिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदेश दिल्यानंतर ही चौकशी करण्यात आली होती. आरोग्य विभागानेही या प्रकरणी चौकशी केली आहे. महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीनेही चौकशी केली आहे. यानंतर आरोग्य विभाग आणि धर्मादाय आयुक्तालयानेही राज्य सरकारला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

आरोग्य विभागाला जाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाईला सुरुवात

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. या प्रकरणात भिसे कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असं आश्वासन कुटुंबियांना दिले होते.

रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

पुणे (Pune) महापालिकाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital) मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी होती.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही थकबाकी भरणे आवश्यक होतं. दोन दिवसांत 22 कोटीची थकबाकी न भरल्यास पुढील कारवाई करावी, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर जप्तीचे कारवाई करण्याचे महापालिकाचे (Pune Municipal Corporation) तोंडी आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिका दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळतंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube