Pune News : गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार, अमित गोरखे

Amit Gorkhe : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने दुसऱ्या रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. मृत महिला आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमित गोरखे (Amit Gorkhe ) यांनी स्पष्ट केलंय.
परवडत नसल्यास ससूनला जा; डॉक्टरांच्या सल्ल्याच्या धसक्याने गर्भवतीचा मृत्यू, पीडित नातेवाईकांचा आरोप
आमदार गोरखे म्हणाले, स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी गर्भवती असताना दीनानाथ रुग्णालयात पैसे कमी असल्याने अॅडमिशन घेतलं नाही. रुग्णालयाकडून 10 लाख रुपये भरण्याचं सांगण्यात आलं. मात्र भिसे कुटुंबियांकडे तीन लाख रुपये असल्याने महिलेवर उपचार केले नाहीत. पर्यायी दुसऱ्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. यावेळी गर्भवती महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला असून पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार दीनानाथ रुग्णालय असून हा गंभीर प्रकारचा गुन्हा घडल्याप्रकरणी आम्ही अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केलंय.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे गोरगरिबांसाठी आहे , एक ट्रस्ट म्हणून चालतं पण गंभीर गुन्हा रुग्णालयाने केलायं अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. पुढील अधिवेशनात आम्ही हा विषय मांडणार असून याविरोधात कडक पाऊले मुख्यमंत्र्यांनी उचलावी अशी विनंती करणार असल्याचंही गोरखे यांनी यावेळी सांगितलं