परवडत नसल्यास ससूनला जा; डॉक्टरांच्या सल्ल्याच्या धसक्याने गर्भवतीचा मृत्यू, पीडित नातेवाईकांचा आरोप

परवडत नसल्यास ससूनला जा; डॉक्टरांच्या सल्ल्याच्या धसक्याने गर्भवतीचा मृत्यू, पीडित नातेवाईकांचा आरोप

Pregnant woman dies due to doctors advice in Dinanath Mangeshkar hospital alleges victim’s relatives : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. उपचाराला उशीर झाला होता. म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा प्रसृतीच्या दरम्यान जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्यू झाला आहे. दीनानाथ रूग्णालयात अॅडमिट करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली जात होती. रूग्ण गंभीर असताना देखील अॅडमिट करून घेतलं नाही, असा आरोप अमित गोरखे यांनी केलाय.

जिन्नांला जितकी मुसलमानांची काळजी नव्हती तितकी भाजपला, संजय राऊतांचा हल्लाबोल

त्याचबरोबर या पिडीतेच्या नातेवाईकांनी देखील यावर पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, दीनानाथ रुग्णालयात गर्भवतीला जेव्हा रक्तश्राव होऊ लागला तेव्हा पूर्वी दिलेलीच औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला. नाहीतर पूर्ण दहा लाख रुपये भरा तेव्हाच उपचार सुरू होतील. अशा स्पष्ट सूचना डॉक्टरांनी सर्व स्टाफ ला दिल्या होत्या. मग आम्ही 3 लाख घेऊन बिलिंग विभागात गेलो. मात्र पुर्ण पैसे नसल्यास रूग्णाला दाखल करणार नाही . असं मिनाक्षी गोसावी यांनी सांगितलं. तुम्हाला परवडत नसल्यास ससूनला जा असा विचित्र सल्ला आम्हाला गर्भवती अत्यंत नाजून अवस्थेत असताना दिला गेला. हा सर्व प्रकार गर्भवतीने पाहिल्याने तिने त्याचा धसका घेतला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. असा आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

अ‍ॅडमिट होण्याआधीच 10 लाख मागितले, गर्भवती महिलेचा मृत्यू … दिनानाथ रुग्णालयावर भाजप आमदाराचा आरोप

दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झालाय. तिथल्या प्रशासनाने झुगारून त्यांना अॅडमिशन दिलं नाही. त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर त्यांना उपचार मिळाले. त्याठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली देखील झाल्या. परंतु दुर्दैवाने त्या आईचा त्याठिकाणी मृत्यू झालाय. दीनानाथ रूग्णालय हे गरिबांसाठी आहे. परंतु अशा प्रकारचा अत्यंत मोठा गुन्हा केलेला आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

म्हाडाचा भोंगळ कारभार! लॉटरीमध्ये फ्लॅट लागला पण बिल्डरने परस्पर विकला…

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे, असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तर आरोपांनंतर दीनानाथ रूग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. रामेश्वर नाईक यांनी देखील रूग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधला होता, परंतु कोणतीही हालचाल केली नाही. जर आमदाराच्या पीएसोबत असं करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा सवाल उपस्थित होतोय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube