अॅडमिट होण्याआधीच 10 लाख मागितले, गर्भवती महिलेचा मृत्यू … दिनानाथ रुग्णालयावर भाजप आमदाराचा आरोप

Amit Gorkhe Allegation On Dinanath Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Hospital) रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. दीनानाथ रूग्णालयाच्या मुजोरीमुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. हा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलाय. आमदार अमित गोरखे (pregnant woman death) यांची पीए सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. दीनानाथ रूग्णालयात अॅडमिट करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली जात होती. रूग्ण गंभीर असताना देखील अॅडमिट करून घेतलं नाही, असा आरोप भाजप (BJP) आमदार अमित गोरखे यांनी केलाय.
दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झालाय. तिथल्या प्रशासनाने झुगारून त्यांना अॅडमिशन दिलं नाही. त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर त्यांना उपचार मिळाले. त्याठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली देखील झाल्या. परंतु दुर्दैवाने त्या आईचा त्याठिकाणी मृत्यू झालाय. दीनानाथ रूग्णालय हे गरिबांसाठी आहे. परंतु अशा प्रकारचा अत्यंत गुन्हा केलेला आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
कोल्हापूरचे पुरुष सर्वाधिक निराश, आकडेवारीतून धक्कादायक खुलासा; मुंबई-पुण्यातील स्थिती कशी?
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे, असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तर आरोपांनंतर दीनानाथ रूग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. रामेश्वर नाईक यांनी देखील रूग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधला होता, परंतु कोणतीही हालचाल केली नाही. जर आमदाराच्या पीएसोबत असं करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा सवाल उपस्थित होतोय.
प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली. अनिशा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील, असे सांगितले मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते.
डान्सबार चालवत असलेला शंतनू कुकडे, अजितदादांचा पदाधिकारी नाहीच! प्रकरणात नवीन ट्वि्स्ट
अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले. त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र त्यांचा करुण अंत झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता, तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या. सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.