जिन्नांला जितकी मुसलमानांची काळजी नव्हती तितकी भाजपला, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Waqf Board : गेल्या काही दिवसांपासून वफ्फ विधेयकावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोप सुरु असून आज राज्यसभेत (Rajya Sabha) वक्फ विधेयकावर (Waf Bill) चर्चा सुरु असून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांला जितकी मुसलमानांची काळजी नव्हती तितकी भाजपला आहे अशी टीका संजय राऊत यांनी या चर्चेदरम्यान भाजपवर केली.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, मला वाटायचं आम्ही हिंदुराष्ट्र बनवणार आहोत पण आता, गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरु आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय-बैल मुसलमालांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होते मात्र तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात. असं यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. हिंदूंच्या जमिनीची रक्षा करता येत नसेल तर मुसलमानांची काय करणार? तुमच्या सरकारला जमीन विक्रीच करायची आहे. असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
काश्मिरी पंडितांना अद्याप घरे नाही : संजय राऊतांचा हल्लाबोल
तर यावेळी बोलताना संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला. काश्मिरी पंडितांना अद्याप घरे आणि जमीन मिळालेली नाही मात्र त्यांची तुम्हाला चिंता नाही. असं संजय राऊत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,सर्व न्यायाधीशांना जाहीर करावी लागणार संपत्ती
तसेच जमिनीचा व्यापार करण्यासाठी तुम्ही विशेष धोरण राबवत आहात असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तर दूसरीकडे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येणार हे पहावे लागेल.