गर्भवती महिलेला कॅन्सर नव्हताच, रुग्णालयाचा आरोप खोटा; आमदार गोरखेंचा दावा

गर्भवती महिलेला कॅन्सर नव्हताच, रुग्णालयाचा आरोप खोटा; आमदार गोरखेंचा दावा

Dinanath mangeshkar hospital death case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनामुळे स्वीय सहाय्यकाच सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत गर्भवती महिलेला कॅन्सर नव्हताच रुग्णालय प्रशासन खोटं बोलत असल्याचा दावा आमदार अमित गोरखे (Amit gorkhe) यांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना केलायं.

पुढे बोलताना अमित गोरखे म्हणाले, हा विषय सरकारचा नसून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाचा आहे. मंगेशकर कुटुंबिय आणि तत्कालीन सरकारने चांगल्या हेतूने हे रुग्णालय सुरु केलं पण रुग्णालय प्रशासन गैरकारभार करतंय. भिसे कुटुंबिय रुग्णालयात गेले तेव्हा एका बाळाला दहा लाख असे वीस लाख भरा असं सांगण्यात आलंय, याचं लेखीही आहे. महिलेला कोणताही कॅन्सर नव्हता, रुग्णालय प्रशासन खोटं बोलत असल्याचा दावा गोरखे यांनी केलायं.

70 कोटी…खोतकरांनी साखर कारखान्यावर दरोडा टाकला, अंजली दमानियांचे गंभीर आरोप

तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेची आयव्हीएफ ट्रीटमेंट सुरु होती. आठव्या महिन्यात प्रसूती होणार हे त्यांना माहित होते. डॉक्टरांशी सुशांत भिसेंचा परिचय होता. डॉक्टर घैसास यांनी पैसे भरण्यास सांगितलं होतं. भिसे कुटुंबिय तीन-चार लाख भरीतही होते. तुम्ही सीसीटिव्ही कॅमेरे, फोन कॉल्स तपासल्यास सर्व काही सत्य समोर येईल, असं गोरखे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देत समिती गठीत केलीयं, त्यांचं मनापासून कौतूक असून राज्यातील इतरही रुग्णालयांचं धोरण, ऑडिट झालं पाहिजे, अशीही मागणी यावेळी अमित गोरखे यांनी केलीयं.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी गारपिटीचा तडाखा; शेती पिकांसह फळ बागांचंही मोठं नुकसान

रुग्णालय दिलगिरी व्यक्त न करता धादांत खोटे आरोप करताहेत…
दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झालायं, याबद्दल दिलगिरी व्यक्त न करता दीनानाथ रुग्णालय प्रशासन धादांत खोटे आरोप करत आहेत. रुग्णालय व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोरखे यांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube