70 कोटी…खोतकरांनी साखर कारखान्यावर दरोडा टाकला, अंजली दमानियांचे गंभीर आरोप

Anjali Damania Allegations On Arjun Khotkar Jalna sugar factory : राज्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वारंवार आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) त्यांचा मोर्चा जालन्याकडे वळविलेला आहे. त्यांनी आता तिथे शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर साखर कारखान्यावरून गंभीर आरोप ( Jalna sugar factory) केलेत. सोबतच खोतकरांवर ईडीची कारवाई करा, अशी देखील मागणी दमानिया यांनी केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील गुन्हेगारी अन् भ्रष्टाचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. आज जालन्यात आज अंजली दमानिया यांची (Anjali Damania News) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी जालन्यातील शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केले की, खोतकर यांनी जालना साखर कारखाना विकत घेताना नियम पाळले नाहीत, तर त्यांनी या कारखान्यावर दरोडा टाकण्याचं काम केलंय.
फसवणूक झालेला मी नाहीच! ऑनलाईन फसवणूकीनंतर वैतागलेल्या सागर कारंडेची टाळाटाळा
एक काळ सर्व राजकारणी सिद्धांत पाळायचे. आताचे राजकारणी बोट लावतील, तिथे माती करतात. खोतकर जिथे जिथे हात लावतात, तिथे माती करतात असा आरोप त्यांनी केलाय. तर अर्जून खोतकर यांच्या विरोधात आम्ही मोठा लढा उभा (Jalna News) करणार, असल्याचं देखील यावेळी अंजली दमानिया यांनी म्हटलंय. हा कारखाना कवडीमोल भावात घेऊन खोतकर यांनी कामगारांवर अन्याय केला. आता त्यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्ग वाकडा करून घेतला,70 कोटी मोबदला खाण्याचा खोतकर यांचा डाव आहे असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केलाय.
ईडीची कारवाई भाजप त्यांना हवी तशी करते, तीआता योग्य करून घ्यावी. जालना समृद्धी मगामार्गाची वाकडी तिकडी लाईन सरळ करा एप्रिल नंतर लढाई लढणार, सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार यातून न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार. साखर कारखाना ईडी प्रकरणात इनटर पिटीशन फाईल करणार, असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिलाय.
‘माझ्या नादाला लागू नको’, नागडा करेन; राऊतांच्या धमकीनंतर प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया समोर…
वेळोवेळी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंचे घोटाळे बाहेर काढले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांवर दबाव वाढलेला होता. संतोष देशमुख हत्येप्रकरणी देखील त्यांना अनेकदा घेरण्यात आलं होतं. परिणामी मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता अर्जून खोतकर यांच्या अडचणी वाढणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.